'खात्रीने सांगतो, मंदिर-गुरुकुलमध्ये हत्यारं मिळणार नाहीत, मग मदरशांची खात्री द्यावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:22 PM2020-03-09T12:22:55+5:302020-03-09T12:26:31+5:30

याआधी रामदेव बाबांनी  नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध देशात झालेल्या आंदोलनांवर टीका केली होती. देशाची विभागणी करण्याचे वक्तव्य करणे देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले होते.

no weapons drugs will be found in any gurukuls baba ramdev | 'खात्रीने सांगतो, मंदिर-गुरुकुलमध्ये हत्यारं मिळणार नाहीत, मग मदरशांची खात्री द्यावी'

'खात्रीने सांगतो, मंदिर-गुरुकुलमध्ये हत्यारं मिळणार नाहीत, मग मदरशांची खात्री द्यावी'

Next

नवी दिल्ली - पंतजली योगपीठाचे योगगुरू रामदेव बाबा यांनी शनिवारी मंदिर आणि गुरुकुलांसंदर्भात वक्तव्य केले. देशभरातील मंदिर आणि गुरुकुलांमध्ये छापेमारी केली तरी एकाही मंदिरात किंवा गुरुकुलमध्ये हत्यारं किंवा आमली पदार्थ मिळणार नाही, असं रामदेव बाबांनी म्हटले आहे. मात्र मशिद आणि मदरशांत असं काही मिळणार नाही, याची दुसऱ्यांनी देखील खात्री द्यावी, असं वक्तव्य रामदेव बाबांनी केले आहे. त्यांचा रोख अर्थात मुस्लिमांवर होता.

पतंजली योगपीठद्वारे संचलित आचार्यकुलमवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नानंतर रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली. रामदेव बाबा म्हणाले की,  मी त्रस्त आहे. मी पहिल्यांदाच अस काही ऐकतोय. सर्व मंदिरांची आणि मदरशांची तपासणी व्हायला हवी. वैदिक शाळा, गुरुकूल आणि पंतजलीद्वारा संचलीत आचार्यकुलमपासून शिशू मंदिरपर्यंत तपासणी व्हायला हवी. यावर मी खात्रीने सांगतो की, देशातील एकाही मंदिरात किंवा गुरुकुलात हत्यार किंवा ड्रग्ज अर्थात अंमली पदार्थ मिळणार नाही, असं रामदेव बाबा यांनी म्हटले.

दरम्यान मशिद किंवा मदरशांमध्ये असं काही बेकायदेशीर होत नाही, याचीही दुसऱ्यांनी खात्री द्यावी, अशी मागणी रामदेव बाबा यांनी केली. आचार्यकुलम वैदिक आणि आधुनिक शिक्षणावर आधारित शाळा आहे. या शाळा पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारे चालवण्यात येतात. ही एक निवासी शिक्षण संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी रामदेव बाबांनी  नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध देशात झालेल्या आंदोलनांवर टीका केली होती. देशाची विभागणी करण्याचे वक्तव्य करणे देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले होते.
 

Web Title: no weapons drugs will be found in any gurukuls baba ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.