निर्भयासाठी कोणीच काही करत नाहीए
By admin | Published: December 20, 2015 01:09 PM2015-12-20T13:09:12+5:302015-12-20T13:09:12+5:30
आम्हाला न्याय हवा आहे. कुठल्याही परिस्थितीत अल्पवयीन दोषीच्या सुटकेला स्थगिती द्या. आम्ही न्याय मागायला गेलो होतो पण आम्हाला त्रास दिला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - आम्हाला न्याय हवा आहे. कुठल्याही परिस्थितीत अल्पवयीन दोषीच्या सुटकेला स्थगिती द्या. आम्ही न्याय मागायला गेलो होतो पण आम्हाला त्रास दिला. जेव्हा रस्त्यांवर महिलांवर अत्याचार होतात तेव्हा सुरक्षा यंत्रणा कुठे असतात ? तेव्हा गुन्हा का रोखत नाहीत ? सरकार आणि पोलिसांना सर्वसामान्यांची चिंता नाही अशी संतप्त भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणा-या दिल्ली महिला आयोगावरही त्यांनी टिका केली. सुनावणी ही दिशाभूल आहे. दिल्ली महिला आयोगाने रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी हाच प्रयत्न सकाळी केला असता तर, सुटकेला स्थगिती मिळू शकली असती असे निर्भयाच्या आईने सांगितले.
निर्भयाच्या वडिलांनीही सुनावणीला अर्थ नसल्याचे म्हटले आहे. भारतातच नव्हे तर, परदेशातही लोकांचा अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला विरोध आहे. त्याने अल्पवयीनसारखा गुन्हा केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही सुटका रोखू शकतात, पण कोणीच काहीही करत नाहीए अशी भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली.