ंतलाव विकासासाठी एनओसी घेणार मनपा: महासभेत येणार प्रस्ताव

By Admin | Published: July 16, 2016 10:38 PM2016-07-16T22:38:53+5:302016-07-16T22:38:53+5:30

जळगाव : मेहरूण तलावाचा ताबा मनपाकडे आहे मात्र जागेची मालकी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे तलाव सुशोभिकरणासाठी जिल्हा प्रशासनाची एनओसी घेण्यात येणार असून त्या संदर्भात ठराव मनपाच्या येत्या २० रोजी होणार्‍या सभेत केला जाणार आहे.

NOC will take the NOC for development of the Mantra: A motion to come in the General Assembly | ंतलाव विकासासाठी एनओसी घेणार मनपा: महासभेत येणार प्रस्ताव

ंतलाव विकासासाठी एनओसी घेणार मनपा: महासभेत येणार प्रस्ताव

googlenewsNext
गाव : मेहरूण तलावाचा ताबा मनपाकडे आहे मात्र जागेची मालकी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे तलाव सुशोभिकरणासाठी जिल्हा प्रशासनाची एनओसी घेण्यात येणार असून त्या संदर्भात ठराव मनपाच्या येत्या २० रोजी होणार्‍या सभेत केला जाणार आहे.
मेहरूण तलाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत व्हावा असे प्रयत्न असल्याचे महापौर नितीन ल‹ा यांनी सांगितले. त्या दृष्टीने शासनाकडून मदत मिळविण्याचे प्रयत्न चालू आहे. राज्य शासन व लोकसहभागातून तलाव परिसर व शिवाजी उद्यान परिसराचा विकास करावा असा प्रस्ताव आहे. दोन्ही ठिकाणांचा एकत्रित प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मात्र तलावाचा ताबा मनपाकडे आहे व जागेची मालकी ही महसूल प्रशासनाची आहे. त्यामुळे विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ना हरकत पत्र मिळविण्याचे प्रयत्न असून तसा ठराव महासभेमार्फत प्रशासनाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडेही पर्यटनाचा विकास निधी मिळावा असे प्रयत्न असल्याचे ल‹ा यांनी सांगितले.
------
पाणी शुद्ध करून सोडावे
तलाव परिसरातील लेआऊट मधील निवासस्थानांचे पाणी तलावात येते. हे पाणी प्रक्रिया करूनच तलावात सोडले जाणे आवश्यक आहे. या परिसराचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी नुकतीच पाहणी केली. त्या दृष्टीने भविष्यात काही नियोजन करता येईल काय? हेदेखील तपासून पाहीले जाईल असे त्यांनी सांगितले.
------

Web Title: NOC will take the NOC for development of the Mantra: A motion to come in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.