कुत्रा चावल्यास मालकाला भरावा लागणार दंड! पाळीव प्राण्यांसाठी नवीन नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 10:29 AM2022-11-13T10:29:33+5:302022-11-13T10:29:51+5:30

Noida Authority New Rules : नोएडा प्राधिकरणाच्या नवीन नियमांनुसार पाळीव कुत्रा एखाद्याला चावला तर त्याच्या मालकाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

noida authority new rules for pets owner have to pay ten thousand rupees fine for dog bite | कुत्रा चावल्यास मालकाला भरावा लागणार दंड! पाळीव प्राण्यांसाठी नवीन नियम लागू

कुत्रा चावल्यास मालकाला भरावा लागणार दंड! पाळीव प्राण्यांसाठी नवीन नियम लागू

Next

नवी दिल्ली : नोएडा प्राधिकरणाच्या (Noida Authority) 207 व्या मंडळाच्या बैठकीत भटके/पाळीव कुत्रे/पाळीव मांजरांसाठी प्राधिकरणाच्या धोरण निर्मितीबाबत मोठे निर्णय घेण्यात आले. नोएडासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या (Animal Welfare Board Of India)  मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नोएडा प्राधिकरणाने धोरण ठरवले आहे. नोएडा प्राधिकरणाच्या नवीन नियमांनुसार पाळीव कुत्रा एखाद्याला चावला तर त्याच्या मालकाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

नोएडा प्राधिकरणाचे नवीन नियम

31 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन अनिवार्य
नोएडा प्राधिकरणानुसार, 31 जानेवारी 2023 पर्यंत पाळीव कुत्रे आणि मांजरींचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन न केल्यास दंड आकारण्यात येईल.

अँटीरेबीज लसीकरण न केल्याबद्दल दंड
पाळीव कुत्र्यांचे नसबंदी/अँटीराबी लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. उल्लंघन झाल्यास 1 मार्च 2023 पासून दरमहा 2000 दंड आकारण्याची तरतूद आहे.

पाळीव प्राण्यांच्या घाणीसाठी मालक जबाबदार असेल
एखाद्या पाळीव कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर ते साफ करण्याची जबाबदारी त्याच्या मालकाची असणार आहे.

कुत्र्याने चावा घेतल्यास त्याच्या मालकाला दंड आकारला जाईल
पाळीव कुत्रा आणि मांजरामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास 10,000 रुपयांचा आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे. याशिवाय, पाळीव कुत्र्याच्या मालकाला जखमी व्यक्ती/प्राण्यावर उपचार करावे लागतील.

Web Title: noida authority new rules for pets owner have to pay ten thousand rupees fine for dog bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा