कारला ई-रिक्षा टच होताच महिला संतापली; 90 सेकंदांत चालकाला 17 वेळा मारल्या थोबाडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 08:04 PM2022-08-13T20:04:15+5:302022-08-13T20:05:11+5:30
महिलेने ई-रिक्षा चालकाला सर्वांसमोर मारहाण केली. दीड मिनिटांत तिनं चालकाला 17 वेळा थोबाडीत दिली. त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. मात्र कोणीही महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने ई-रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. ई-रिक्षा कारला टच झाल्याने महिला संतापली आणि तिने ई-रिक्षा चालकाला मारहाण करायला सुरुवात केली. तिने 90 सेकंदात तब्बल 17 वेळा थोबाडीत मारली. भडकलेल्या महिलेने ई-रिक्षा चालकाला रोखलं. त्याचं शर्ट धरून त्याला कारजवळ आणलं. त्यानंतर त्याला थोबाडीत लगावण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने ई-रिक्षा चालकाला सर्वांसमोर मारहाण केली. दीड मिनिटांत तिनं चालकाला 17 वेळा थोबाडीत दिली. त्यावेळी तिथे अनेकजण उपस्थित होते. मात्र कोणीही महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळी ई-रिक्षा चालक काहीच न बोलता गुपचूप उभा होता. महिलेनं त्याचे पैसे आणि मोबाईल हिसकावला. ती भाजपच्या महिला मोर्चाची सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी व्हिडीओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.रिक्षा चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ई-रिक्षा चालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.