'नोकिया 3310' पुन्हा होणार लॉंच
By admin | Published: February 16, 2017 06:10 PM2017-02-16T18:10:15+5:302017-02-16T18:15:13+5:30
नोकिया कंपनी आपला 'नोकिया 3310' हा मोबाईल पु्हा मार्केटमध्ये आणणार आहे. 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये हा मोबाईल पहिल्यांदा भारतात लॉंच करण्यात आला होता.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - नोकिया कंपनी आपला 'नोकिया 3310' हा मोबाईल पु्हा मार्केटमध्ये आणणार आहे. 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये हा मोबाईल पहिल्यांदा भारतात लॉंच करण्यात आला होता. त्यावेळी या मोबाईलला अनेक ग्राहकांनी पसंती दर्शविली होती. तसेच, मोठ्या प्रमाणात खरेदी सुद्धा केली होती.
या महिन्यात 26 फेब्रुवारीला बार्सिलोना येथे होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये नोकिया कंपनी 'नोकिया 3310' हा मोबाईल पुन्हा लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र, हा मोबाईल स्मार्टफोन असेल की फीचर फोन हे सुद्धा अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.
दरम्यान, नोकिया एकेकाळी मोबाईल प्रॉडक्ट्मधली सर्वात विश्वसनीय कंपनी मानली जायची. मात्र नंतर अनेक मोबाईल कंपन्यांचे स्मार्टफोन्स आले. त्यामुळे नोकियाचे लहान फोन मागे पडले. त्यानंतर नोकियाचे अँड्रॉईड फोन सुद्धा मार्केटमध्ये आले. मात्र, स्मार्टफोन्स वापरणाऱ्या लोकांना पर्याय म्हणून 'नोकिया 3310' हा फोन मार्केटमध्ये आणणार असल्याचे समजते.