नोटाबंदी : गुगलवर शोधा जवळचे 'एटीएम'

By admin | Published: November 16, 2016 05:02 PM2016-11-16T17:02:35+5:302016-11-16T17:02:35+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे.

Nomad: Search on Google's nearest ATM | नोटाबंदी : गुगलवर शोधा जवळचे 'एटीएम'

नोटाबंदी : गुगलवर शोधा जवळचे 'एटीएम'

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.16 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. देशभरातील बॅंकामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी नागरिकांनी बॅंकांतून गर्दी केली आहे. तसेच. एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुद्धा अनेकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यातच पैशांचा तुडवडा असल्याकारणाने अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सोशल नेटवर्किंगमध्ये अग्रेसर असलेले गुगल नागरिकांच्या मदतीला धावून आले आहे.
गुगलने एक नवीन टूल तयार केला आहे. गुगलच्या सर्च इंजिनवर ‘Find an ATM near you’ या लिंकवर क्लिक करताच गुगल स्वतः आपल्या कॉम्प्युटरची जागा शोधून त्या ठिकाणाच्या जवळपास असलेल्या एटीएमची ठिकाणे गुगल मॅपवर दाखवते. ही सुविधा डेक्सटॉप आणि मोबइलवर सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे. 
तसेच, atmsearch.in  आणि cashnocash.com या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला एटीएमची माहिती मिळू शकते. cashnocash.com या वेबसाइटच्या माध्यमातून कोणत्या एटीएममध्ये पैसे आहेत की नाही हे कळेल. त्यामुळे जास्त ठिकाणी एटीएम पाहण्यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच, फारवेळ रांगेत उभे रहावे लागणार नाही. याचबरोबर कोणत्या एटीएममध्ये पैसे आहेत, कुठे कमी रांग आहे याची माहिती मिळविण्यासाठी तुम्ही वॉलनट (Walnut) नावाचे अॅप डाऊनलोड करू शकता.
 

Web Title: Nomad: Search on Google's nearest ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.