नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम

By admin | Published: March 3, 2017 04:29 AM2017-03-03T04:29:01+5:302017-03-03T04:29:01+5:30

नोटाबंदीचा भारतीय वित्तीय स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मुडीजने म्हटले आहे.

Nominate India's Positive Results | नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम

नोटाबंदीचा भारतावर सकारात्मक परिणाम

Next


नवी दिल्ली : नोटाबंदीचा भारतीय वित्तीय स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल, असे आंतरराष्ट्रीय मानक संस्था मुडीजने म्हटले आहे. नोटाबंदीमुळे करचुकवेगिरी आणि भ्रष्टाचाराला चाप लागेल, असे मुडीजने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने आपल्या अहवालात म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था संकटांचा सामना करण्याच्या बाबतीत मजबूत आहे. चलनी नोटांच्या तुटवड्याचा काळही आता निघून गेला आहे. याची आता मागणी आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.
अमेरिकी संस्था असलेल्या मुडीजने म्हटले की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारताचा वृद्धीदर मात्र घसरून ६.४ टक्क्यांवर येईल. मागील तीन तिमाहींत तो ७ टक्के आहे. भविष्यकाळाकडे पाहताना चलन तुटवडा भरून काढण्याची प्रक्रिया आहे त्याच गतीने सुरू राहील, अशी आम्हास अपेक्षा आहे.
मुडीने म्हटले की, मध्यम कालावधीसाठी नोटाबंदीचा भारतीय संस्थात्मक संरचनेला मजबुती देण्यासाठी उपयोगच होणार आहे, असा आमचा विश्वास आहे. कारण त्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसेल. भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल. अर्थव्यवस्था आणि आर्थिक व्यवहारांना गती मिळून अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल.
अंतिमत: कर आधार वाढेल तसेच वित्तीय यंत्रणेचा वापरही वाढेल. या सगळ्या बाबी पत व्यवस्थेसाठी सकारात्मक आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>जास्तीचा कर मिळेल
नोटाबंदीत सर्व नोटा बँकांत भरल्या गेल्या असतील, तर त्याचा सरकारला लाभच होईल.
बेहिशेबी मालमत्ता त्यामुळे वैध होईल. भविष्यात त्यावर जास्तीचा कर मिळेल. बेहिशेबी नोटा जमा झाल्यानंतरही जास्तीचा कर सरकारला मिळेल.

Web Title: Nominate India's Positive Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.