नोटाबंदी : मोदींचा निर्णय साहसी - शत्रुघ्न सिन्हांचे कौतुकाद्गार

By admin | Published: November 18, 2016 12:19 PM2016-11-18T12:19:45+5:302016-11-18T12:20:24+5:30

भाजपा खासदार व अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Nomination: Modi's decision is courageous - Shatrughan Sinha's praise | नोटाबंदी : मोदींचा निर्णय साहसी - शत्रुघ्न सिन्हांचे कौतुकाद्गार

नोटाबंदी : मोदींचा निर्णय साहसी - शत्रुघ्न सिन्हांचे कौतुकाद्गार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - वादग्रस्त विधाने करत भाजपाला अडचणीत आणणारे, तर कधी स्वत:च्या पक्षाविरोधातच वक्तव्य करणारे भाजपा खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर नोटाबंदीच्या निर्णयावर मौन सोडले आहे. ' काळ्या पैशावर अंकुश लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेले पाऊल साहसी आणि बुद्धिमत्तापूर्ण आहे' असे कौतुकोद्गार सिन्हा यांनी काढले आहेत. मात्र त्याचवेळी या निर्णयाची अमलबजावणी करताना जनतेसमोर निर्माण झालेल्या अडचणींबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून त्यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 
(भाजपाने आत्मपरिक्षण करावे - शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर)
(हाथी चले बिहार..... भौंके हजार - शत्रुघ्न सिन्हांचा भाजपावर पलटवार)
 
 
' (या निर्णयासाठी) मी पंतप्रधानांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो.  मात्र या निर्णयाची अमलबजावणी करताना टीममधील लोकांच्या तयारीच्या अभावामुळे, योजनांमुळे मी निराश झालो आहे' असे त्यांनी म्हटले आहे. ' सामान्य लोकांचे नुकसान, त्यांना त्रास न होता, काम कसे करता येईल यासाठी आपण तयारी करायला हवी होती. आपल्या मतदारांपैकी बहुतांश लोक गरीब आहेत. इतक्या दिवसानंतर लोकांना (त्रासातून) आराम मिळाला आहे, मात्र हे याआधीच व्हायला हवे होते' अशा शब्दांत सिन्हा यांनी टीकाही केली

Web Title: Nomination: Modi's decision is courageous - Shatrughan Sinha's praise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.