नोटाबंदी ही भ्रष्टाचाराविरुद्धची शेवटची कारवाई नाही
By admin | Published: December 22, 2016 10:29 PM2016-12-22T22:29:44+5:302016-12-22T22:29:44+5:30
नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. मात्र नोटाबंदी ही काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध
Next
>ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 22 - नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. मात्र नोटाबंदी ही काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध करण्यात आलेली शेवटची कारवाई नाही. ते याविरोधात टाकलेले एक पाऊल आहे. काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात यानंतरही कारवाई सुरू राहील, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया यांनी म्हटले आहे
नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलनटंचाईंमुळे होत असलेले जनतेचे हाल आणि भ्रष्टाचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काळे पैसे बदलून घेतल्याने हा निर्णय फसल्याचा आरोपही होत आहे. मात्र भूवनेश्वर येथे बोलताना पांगरिया यांनी या निर्णयाचा बचाव केला. "नोटाबंदीचा निर्णय ही काळ्या पैशाविरोधात करण्यात आलेली शेवटची कारवाई नाही. आम्ही काळ्यापैशाविरोधात यापुढे अधिक कारवाई करणार आहोत. तसेच काळापैसा आणि काळापैसा निर्माण करणारे स्त्रोत यावर अंकुश आणण्याच्या दृष्टीने आम्हाला काम करावे लागणार आहे,''असे पांगरिया यांनी सांगितले.