‘पद्म’ पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 04:37 AM2019-05-30T04:37:34+5:302019-05-30T04:37:45+5:30
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विशिष्ट सेवाकार्य आणि असामान्य यशाला मान्यता देण्यासाठी ‘पद्म’ पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
नवी दिल्ली: विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विशिष्ट सेवाकार्य आणि असामान्य यशाला मान्यता देण्यासाठी ‘पद्म’ पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया
सुरु करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी घोषित करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या शिफारशींसाठी आॅनलाइन नामांकन एक मेपासून सुरु करण्यात आले असून अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
पद्म पुरस्कारांसाठी नामांकन किंवा शिफारशी पद्म पोर्टलवर (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट पद्म अवार्डस् डॉट. जीओव्ही. इन) आॅनलाइन स्वीकारल्या जातील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान, उत्कृष्ट कार्य आणि यश खºया अर्थाने मान्यता मिळण्यासाठी हकदार आहेत, अशा प्रतिभावान व्यक्ती निश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये, विभाग, राज्ये, केंद्रशासित प्रशासन, भारत रत्न आणि पद्म विभूषण प्राप्त व्यक्ती आणि उत्कृष्ट संस्थांनी ठोस प्रयत्न करावेत, असे गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
सर्व नागरिक स्वत:च्या नामांकनासह दुसºया व्यक्तीसाठी नामांकन किंवा शिफारशी करु शकतात. एखाद्या व्यक्तीसाठी आॅनलाइन शिफारस करतांना सर्व आवश्यक माहिती विहित नमुन्यात दिली जावी. पद्म पुरस्कारांसाठी कोणतीही योग्य व्यक्ती नामांकन करू शकते.