अपारंपरिक ऊर्जा धोरण १० दिवसांत --भाग २
By admin | Published: February 10, 2015 12:56 AM2015-02-10T00:56:27+5:302015-02-10T00:56:27+5:30
चौकट...
Next
च कट...शेतकरी अनुदान १५ दिवसांत बँक खात्यात हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यापैकी दोन हजार कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. येत्या १५ दिवसांत ही रक्कम बँकेत जमा केली जाईल व शेतकऱ्याला मिळेल. जिल्हा बँकेला दिलेले अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जात नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही शासकीय अनुदानाचे पैसे जिल्हा बँकेमार्फत दिले जाणार नाहीत. जनधन योजनेंतर्गत ८५ टक्के शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे. उर्वरित १५ टक्के शेतकऱ्यांचेही खाते त्वरित उघडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी लीड बँकेची बैठक घेणार असून, तहसीलदारांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. या खात्यातच अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. चौकट...सावकरी कर्जाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्याअधिकृत सावकाराकडून शेतकऱ्याने घेतलेले कर्ज राज्य सरकारने माफ केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सावकारी कर्जाचा तपशील तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. या प्रस्तावांच्या आधारावर कर्जमाफीची पुढील प्रक्रिया केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.