1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:53 AM2023-03-03T09:53:02+5:302023-03-03T09:53:32+5:30

राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जाणून घ्या काय आहे भाजपची खेळी...

North-East May Get First Woman CM BJP will play a big move in Tripura | 1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

1 तीर 2 शिकार? नॉर्थ-ईस्टला मिळू शकते पहिली महिला CM! त्रिपुरात भाजप चालणार मोठी चाल

googlenewsNext

अगरतळा - भाजप आणि आयपीएफटी युतीने एकूण 60 सदस्य संख्या असलेल्या त्रिपुरा विधानसभेत 33 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. या युतीने 2018 मध्ये राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (सीपीआय-एम) 25 वर्षांची सत्ता उखडून टाकली होती. हा केवळ योगायोग नव्हता हेदेखील या विजयावरून सिद्ध झाले आहे. या निवडणुकीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा हेच आपले CM पदाचे उमेदवार असतील, असे या पक्षांनी जाहीरपणे मान्य केले होते. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर हे पक्ष आपल्या या निर्णयाची पुन्हाएकदा समीक्षा करू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तानुसार, पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय नेतृत्व सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांना राज्यातील सर्वोच्च पदावर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीपूर्वी 'ईशांन्येकडील राज्यांसह संपूर्ण देशात योग्य संदेश जाऊ शकतो.

याच बरोबर, पक्षातील आणिखी एका सूत्राने म्हटल्याप्रमाणे, साहा यांनी पक्षाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे असे होणे अशक्य आहे. मात्र काही दिवसांनंतर, हा बदल होऊ शकतो. भौमिक मुख्यमंत्री झाल्यास, त्या ईशान्येकडील इतिहासातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील.

केंद्रात लागू शकते माणिक साहा यांची वर्णी -
भौमिक यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारले असता एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे की, हे नाकारता येत नाही. जर केंद्राने भौमिक यांना त्रिपुराचे मुख्यमंत्री बनविण्याचा विचार केला, तर माणिक साहा यांना केंद्रात पाठवले जाऊ शकते.” महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानंतर, समर्थनाच्या आधारावर महिलांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्या उत्सुक असतानाच, भाजप भौमिक यांना त्रिपुराचे मुख्यमंत्री बनवण्याचा विचार करत आहे.  

त्रिपुरामध्ये महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा अधिक -
भौमिक या भारत आणि बांगलादेश सीमेला लागून असलेल्या धनपूर गावातील एका शेतकरी कुटुंबातून आल्या आहेत. आदिवासीबहुल भागांत झटका बसला असतानाही, राज्यात भाजपला पुन्हा एकदा सत्तेपर्यंत पोहचविण्यात महिला मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या वर्षी महिलांनी (89.17%) पुरुषांच्या (86.12%) तुलनेत अधिक मतदान केले. धनपूर येथून भौमिक यांचा 3,500 मतांनी विजय झाला आहे. माकपचे ज्येष्ठ नेते माणिक सरकार याच मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले होते. 2018 मध्येही ते येथूनच निवडून आले होते आणि विरोधी पक्षनेते झाले होते.

Web Title: North-East May Get First Woman CM BJP will play a big move in Tripura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.