हृदयद्रावक! स्टेशनवरचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; पतीच्या डोळ्यादेखत पत्नी आणि लेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:10 PM2023-10-13T12:10:46+5:302023-10-13T12:15:39+5:30

North East Train Accident: आनंद विहार टर्मिनलवर सेल्फी घेऊन एका कुटुंबाने नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. चार जणांच्या या कुटुंबाला जलपाईगुडीला जायचं होतं.

north east train accident family broke up halfway mother and daughter died tragic accident | हृदयद्रावक! स्टेशनवरचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; पतीच्या डोळ्यादेखत पत्नी आणि लेकीचा मृत्यू

फोटो - hindi.news18

आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे काही डबे बुधवारी रात्री बिहारमधील बक्सरजवळ रुळावरून घसरले. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

आनंद विहार टर्मिनलवर सेल्फी घेऊन एका कुटुंबाने नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. चार जणांच्या या कुटुंबाला जलपाईगुडीला जायचं होतं. कुटुंब आनंदाने या ट्रेनमध्ये चढलं. दीपक भंडारी हे त्यांची पत्नी उषा भंडारी, जुळ्या मुली आकृती आणि अदिती यांच्यासह प्रवास करत होते. त्यांची सीट इकॉनॉमी एम 1 मध्ये होती. सुट्टीच्या दिवशी ते त्यांच्या गावी जलपाईगुडीला जात होते.

ही ट्रेन रघुनाथपूर स्टेशनवर पोहोचताच रात्री 09.53 वाजता आनंद विहार टर्मिनलवरून कामाख्याकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला. यामध्ये ट्रेनचे 23 डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात दीपकची पत्नी आणि त्यांची मुलगी आकृती यांचा रेल्वेच्या खिडकीतून पडून मृत्यू झाला. दीपक आणि आदिती जखमी झाले आहेत. ज्यांवर रघुनाथपूरच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

या रेल्वे अपघातातून वाचलेली दुसरी मुलगी अदिती सतत तिच्या वडिलांना तिच्या आई आणि बहिणीबद्दल विचारत आहे. ती तिच्या शेवटच्या फोटोकडे तासन्तास पाहत होती. वडील व मुलगी आदिती यांच्यावर उपचार सुरू असून दोघेही धोक्याबाहेर आहेत. मात्र त्यांची पत्नी आणि एक मुलगी हे जग सोडून गेले. या दुर्दैवी घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काही गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत म्हणून देण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: north east train accident family broke up halfway mother and daughter died tragic accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.