उत्तर भारतीयांचे पलायन; काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:29 AM2018-10-09T06:29:31+5:302018-10-09T06:29:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले की, त्यांनी त्यांच्या गुजरातेत या राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या लोकांना पळवून लावण्याचा कट रोखावा व ते जर तसे करू शकत नसतील, तर पद सोडून द्यावे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानातून आलेल्या लोकांना गुजरात, महाराष्ट्रातून हुसकून लावण्याच्या बातम्यांवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले की, त्यांनी त्यांच्या गुजरातेत या राज्यांतून रोजगारासाठी आलेल्या लोकांना पळवून लावण्याचा कट रोखावा व ते जर तसे करू शकत नसतील, तर पद सोडून द्यावे.
पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी यांना आठवण करून दिली की, उत्तर प्रदेशच्या लोकांनी मोदी यांना वाराणसीतून खासदार म्हणून निवडून दिले व पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले. पलायनाच्या घटनांत ठाकूर सेनेकडून जो हिंसाचार केला जात असल्याचे सांगितले जाते त्यावर बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, अल्पेश ठाकूर यांनी त्याचा खुलासा केला आहे. वस्तुस्थिती ही आहे की, भाजपचे कार्यकर्ते ठाकूर सेनेला बदनाम करण्यासाठी सेनेचे नाव घेऊन उत्तर प्रदेश, बिहार लोकांवर हल्ले करीत आहेत.