भाकरीवरून उत्तर विरुद्ध दक्षिण वाद पेटला, कर्नाटकमधील विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:13 IST2025-03-08T15:10:46+5:302025-03-08T15:13:38+5:30

Karnataka Crime News: एकीकडे तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून राजकारण तापले असताना कर्नाटकमध्ये उत्तर आणि दक्षिणेतील विद्यार्थ्यांमध्ये भाकरीवरून वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे. कर्नाटक केंद्रीय  विद्यापीठ, कलबुर्गी येथे भाकरीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हा वाद झाला.

North vs South dispute over bread, students clash at university in Karnataka | भाकरीवरून उत्तर विरुद्ध दक्षिण वाद पेटला, कर्नाटकमधील विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

भाकरीवरून उत्तर विरुद्ध दक्षिण वाद पेटला, कर्नाटकमधील विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

एकीकडे तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून राजकारण तापले असताना कर्नाटकमध्ये उत्तर आणि दक्षिणेतील विद्यार्थ्यांमध्ये भाकरीवरून वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे. कर्नाटक केंद्रीय  विद्यापीठ, कलबुर्गी येथे भाकरीवरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हा वाद झाला. कर्नाटक केंद्रीय विद्यापीठ, कलबुर्गी जिल्ह्यामधील अलंद तालुक्यात कडागांची गावामध्ये आहे. तिथे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या कॅन्टिनमध्ये भाकरीवरून झालेल्या वादाचं पर्यावसन हाणामारीत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये दोन विद्यार्थ्यांत भाकरीवरून वादावादीला सुरुवात झाली. त्यावेळी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी मशीनवर तयार केलेल्या भाकरीची मागणी केली. तर दक्षिण भारतीय विद्यार्थ्यांना हाताने तयार केलेली भाकरी हवी होती. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद थोड्याच वेळात धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. मग बघता बघता दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भांडणात अनेक विद्यार्थी सहभागी होते. त्यात प्रशांत, सुहास आणि इतर विद्यार्थी मुख्यत्वेकरून सहभागी होते. या धक्काबुक्कीमध्ये अनिकेत नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस तिथे येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण बनली. या घटनेनंतर विद्यापीठाच्या रजिस्ट्रारनी नरौना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.  

Web Title: North vs South dispute over bread, students clash at university in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.