नोटाबंदी : भारताच्या राजकारणातील उत्तम निर्णय - विराट कोहली

By admin | Published: November 16, 2016 01:03 PM2016-11-16T13:03:27+5:302016-11-16T16:16:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा हा निर्णय भारताच्या राजकारणातील उत्तम निर्णय असल्याचे सांगत विराट कोहलीने कौतुक केले.

Nostalgia: The Best Decision in Indian Politics - Virat Kohli | नोटाबंदी : भारताच्या राजकारणातील उत्तम निर्णय - विराट कोहली

नोटाबंदी : भारताच्या राजकारणातील उत्तम निर्णय - विराट कोहली

Next
ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १६ - काळा पैशा विरोधातील मोहिम तीव्र करत व्यवहारातून ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे देशभरातील जनतेने स्वागत केले. मात्र काही लोकांना हा निर्णय फारसा पटलेला नसून नोटा रद्द करण्याचा निर्णय तत्काळ लागू झाल्याने दैनंदिन कामाकाजात येणा-या अडथळ्यामुळे नागरिक वैतागले. आठवड्याभरातनंतरही सोशल मीडियावरही हा मुद्दा सध्या भलताच चर्चेत असून अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनीही मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. 
भारताचा स्टार फलंदाज आणि कसोटी क्रिकेट कर्णधार विराट कोहलीनेही मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ' भारतीय राजकारणाच्या इतिहासातील (नोटबंदीचा निर्णय) सर्वात उत्तम निर्णय आहे. या निर्णयामुळे मी खरंच प्रभावित झालो आहे' अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे. 
' मला माझ्या हॉटेलचे बिल भरायचे होते, मात्र ( नोटाबंदीच्या निर्णयानंतर) आता मी ते भरू शकत नसल्याचे माझ्या लक्षात आहे. मी त्या नोटांवर सही करून चाहत्यांना देऊ शकलो असतो' असेही त्याने पुढे गमतीत म्हटले. 
दरम्यान मोदींच्या या निर्णयावर महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री अनुष्का शर्मा, हुमा कुरेशी, परेश रावल, सुनील शेट्टी, मधुर भांडारकरसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक केले होते. २००० रुपयांची नवी नोट गुलाबी रंगाची असल्याच्या मुद्यावर भाष्य करतानाच बॉलिवूडचे शहेनशहा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी हा तर ' PINK' ( पिंक चित्रपटा) इफेक्ट आहे, असे म्हटले होते. तर अभिनेता अजय देवगणने तर ‘१०० सोनार की, १ लोहार की’ असे ट्विट करत या निर्णयाला पंतप्रधानांचा मास्टर स्ट्रोक म्हटले. सुपरस्टार रजनीकांत यांनीही ‘एका नव्या भारताचा जन्म झाला आहे’ असे ट्विट करत  #JaiHind हा हॅशटॅगही जोडला होता.
(हा तर PINK इफेक्ट - अमिताभ बच्चन)

 

Web Title: Nostalgia: The Best Decision in Indian Politics - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.