नोटाबंदी; कल्पना चांगली अंमलबजावणी सदोष, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. थालेर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:31 AM2017-11-20T04:31:03+5:302017-11-20T04:31:10+5:30
नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता
नवी दिल्ली : एक हजार आणि पाचशे रुपये यासारख्या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र खूपच सदोष पद्धतीने केली गेली, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार मिळविणारे अर्थतज्ज्ञ प्रा. रिचर्ड थालेर यांनी व्यक्त केले आहे.
शिकागो विद्यापीठातील स्वराज कुमार या विद्यार्थ्याने नोटाबंदीविषयी प्रा. थालेर यांचे मत विचारले होते. त्याला प्रा. थालेर यांनी टिष्ट्वटरवर उत्तर दिले. स्वराज कुमार याने मूळ प्रश्न आणि त्यावरील प्रा. थालेर यांचे उत्तर टिष्ट्वटरवर टाकले. प्रा. थालेर यांचे हे मतप्रदर्शन नवे नाही. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर प्रा.थालेर यांनी लगेच टिष्ट्वटरवर त्याचे स्वागत करताना लिहिले होते की, या धोरणाचा मी पाठीराखा आहे. रोखताविरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे व भ्रष्टाचार कमी करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात आहे. मात्र नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्याचे कळल्यावर प्रा. थालेर यांनी ‘खरंच? बोंबला!’ असे दोनच शब्दाचे टिष्ट्वट केले.
>काळ्या पैशावर चालणाºया समांतर अर्थव्यवस्थेवर घाला घालणे आणि अर्थव्यवस्थेतील रोखीचे व्यवहार कमी करणे, या उद्देशांनी नोटाबंदी करण्यात आली हे विचारात घेतले तर नोटाबंदी लागू असतानाच लगोलग दोन हजार रुपयांच्या नव्या चलनी नोटा काढण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता, असेही प्रा. थालेर यांनी म्हटले.