मुले नव्हे, मुलीच संपत्तीच्या वारसदार

By admin | Published: July 16, 2017 01:37 AM2017-07-16T01:37:19+5:302017-07-16T01:37:19+5:30

भारतातील मेघालय, आसाम तसेच बांगलादेशातील काही भागांत खासी जमातीचे वास्तव्य आहे. या जमातीत प्राचीन काळापासून मुलींना घरात उच्च दर्जा आहे.

Not the children, the heirs of the daughter | मुले नव्हे, मुलीच संपत्तीच्या वारसदार

मुले नव्हे, मुलीच संपत्तीच्या वारसदार

Next

शिलाँग : भारतातील मेघालय, आसाम तसेच बांगलादेशातील काही भागांत खासी जमातीचे वास्तव्य आहे. या जमातीत प्राचीन काळापासून मुलींना घरात उच्च दर्जा आहे. ही जमात पूर्णत: मुलींनाच समर्पित आहे. मुलीच वडिलोपार्जित संपत्तीच्या मालक असतात. मुलीचा जन्म झाल्यानंतर या जमातीत आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलाचा जन्म होणे मात्र वाईट मानले जाते. या जमातीत अशा काही परंपरा आहेत, ज्या भारतीय संस्कृतीच्या अगदी विरुद्ध आहेत. येथे लग्नानंतर मुलींऐवजी मुलांची बिदाई केली जाते. मुली आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. मुले मात्र आपल्या आई-वडिलांना सोडून सासुरवाडीला घरजावई बनून राहतात. येथे मुलींवर कोणत्याही प्रकारची बंधने नसतात. कौटुंबिक धन-दौलतीच्या वारसही मुलीच असतात. या जमातीत महिलांचे इतके वर्चस्व आहे की, त्या अनेक पुरुषांसोबत लग्न करू शकतात. अलीकडे काही पुरुष मंडळी या प्रथेत बदल करण्याची मागणी करू लागले आहेत. या पुरुषांचे म्हणणे आहे की, आम्ही महिलांचे महत्त्व कमी करू इच्छित नाही. मात्र, आम्हाला बरोबरीचा हक्क हवा आहे. या जमातीमध्ये कौटुंबिक निर्णय घेण्याचा अधिकारही महिलांनाच आहे.

Web Title: Not the children, the heirs of the daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.