गोरक्षक नव्हे, समाजकंटक!

By admin | Published: August 7, 2016 05:02 AM2016-08-07T05:02:01+5:302016-08-07T05:02:01+5:30

गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी स्वत:ची दुकानदारी थाटली आहे. या गोरक्षकांपैकी ७० ते ८० टक्के लोक रात्री भलतेच गोरखधंदे (काळे धंदे) करणारे असून, सर्व राज्य सरकारांनी त्यांची माहिती

Not the civic, miscreant! | गोरक्षक नव्हे, समाजकंटक!

गोरक्षक नव्हे, समाजकंटक!

Next

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी स्वत:ची दुकानदारी थाटली आहे. या गोरक्षकांपैकी ७० ते ८० टक्के लोक रात्री भलतेच गोरखधंदे (काळे धंदे) करणारे असून, सर्व राज्य सरकारांनी त्यांची माहिती गोळा करावी आणि त्यांचे उद्योग जनतेसमोर आणावेत, असा सणसणीत टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लगावला.
प्लास्टीक खाऊन मरणाऱ्या गायी वाचविल्या तरी ती फार मोठी गोसेवा होईल, असे सांगून मोदी म्हणाले की, जेवढ्या गायी कत्तल केल्याने मरत नाहीत, त्याहून अधिक गायी कचराकुंड्यांमधील प्लास्टीक खाऊन मरतात. गाईच्या पोटातून दोन बादल्या भरून प्लास्टीक शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरनी काढलेले स्वत: पाहिले आहे, असे मोदी म्हणाले. या गायींना प्लास्टीक खावे लागणार नाही, यासाठी काम करणे ही खरी गोसेवा ठरेल, असे त्यांनी सुनावले. गुजरातमध्ये उना येथे मेलेल्या गायीचे कातडे सोलणाऱ्या दलितांना मारहाण व गोरक्षणाच्या नावाने दलित व मुस्लिमांना मारहाण करून प्रसंगी त्यांचे खून अशा घटना घडत आहेत. हिंदुत्ववाद्यांच्या आशीर्वादाने गोरक्षकांनी उच्छाद मांडला असूनही मोदी चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका होत होती. मोदींनी टीकाकारांची तोंडे बंद करतानाच मोकाट गोरक्षकांनाही चपराक लगावली.
सुप्रशासनाद्वारेच सामान्यांच्या समस्या सुटतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. ते म्हणाले, भारत जगातील सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, पुढील ३0 वर्षांत ८ टक्क्यांच्या गतीने ती वाढल्यास जगातील प्रत्येक उत्कृष्ट गोष्ट भारतीयांच्या पायाशी असेल. ‘खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन’चा अवलंब करून आपण ५ टक्के खादी वापरली तरी गरिबांचे आयुष्य बदलेल.

कमालीचा संताप होतो
- गोरक्षणाच्या नावे दुकानदारी थाटल्याचे पाहून आपल्याला कमालीचा संताप होतो, असे सांगून मोदी म्हणाले की, गोभक्त आणि गोरक्षक यांच्यात फरक आहे. मोदी म्हणाले, पूर्वी (मुस्लीम) बादशहा व (हिंदू) राजे यांच्यात लढाया होत.
- बादशहा चलाखीने आपल्या सैन्याच्या अघाडीवर गायी ठेवत. त्यामुळे समोरच्या राजाच्या सैन्याची पंचाईत होई. शस्त्रे-अस्त्रे चालवली तर गायी मरतील, याची त्यांना चिंता असे. या बादशहांप्रमाणे हल्लीचे कथित गोरक्षक गोरक्षणाचा अंगरखा घालून वावरत आहेत.

टाउन हॉल पद्धतीच्या कार्यक्रमात जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या या पहिल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पीएमओ मोबाइल अ‍ॅप लाँच केले.

मोदींच्या भाषणातील मुद्दे : लहान मुलांचे लसीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याची गरज, पर्यटन व्यवसायाला चालना, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण, सुप्रशासन, स्वच्छता अभियान अशा अनेक मुद्द्यांचा पंतप्रधानांच्या भाषणात समावेश होता.

Web Title: Not the civic, miscreant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.