‘प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असे नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:17 AM2018-01-30T02:17:25+5:302018-01-30T02:17:30+5:30
नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.
कोलकाता : नाटकावरून बनविलेला प्रत्येक चित्रपट उत्कृष्ट होईलच असे नाही. प्रत्येक माध्यमांतर यशस्वी होईलच असेही नाही. मात्र, मूळ मुद्द्यांना धक्का न लावता एखाद्या गोष्टीचे माध्यमांतर झाले, तर त्यात काहीही चुकीचे नाही, असे मत प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांनी येथे व्यक्त केले.
एलकुंचवार यांच्या होळी, पार्टी, सोनाटा या नाटकांवरून ख्यातनाम दिग्दर्शकांनी चित्रपट बनविले आहेत. महेश एलकुंचवार यांनी सांगितले की, माध्यमांतर हे प्रत्येक वेळेस नीट होईलच असे नाही. काही काही वेळेसच ती भट्टी जमून येते. प्रत्येक कथानकाचे, कलाकृतीचे स्वत:चे एक व्याकरण असते. माध्यमांतर करणाºयाने ते व्याकरण लक्षात
घेऊन काम केले पाहिजे. मोनोलॉग २०१८ हा नाट्यवाचनाचा कार्यक्रम रविवारी कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महेश एलकुंचवार म्हणाले की, जर कथाविषयाचा मूळ गाभा लक्षात घेतला नाही, तर माध्यमांतर फसण्याची शक्यता अधिक असते.