125 कोटी लोकसंख्येमध्ये प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही - अमित शहा

By admin | Published: May 27, 2017 12:14 PM2017-05-27T12:14:04+5:302017-05-27T12:14:04+5:30

आमचे सरकार स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देत असून आतापर्यंत आम्ही आठ कोटी लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

Not everyone can get jobs in 125 crores population - Amit Shah | 125 कोटी लोकसंख्येमध्ये प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही - अमित शहा

125 कोटी लोकसंख्येमध्ये प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही - अमित शहा

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 27 - 125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये प्रत्येकाला रोजगार देणे शक्य नाहीय. त्यामुळे रोजगाराच्या विषयाकडे आम्ही वेगळया दृष्टीकोनातून पाहतोय. आमचे सरकार स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देत असून आतापर्यंत आम्ही आठ कोटी लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला आहे असा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला. मोदी सरकारच्या तिस-या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची कशी प्रगती सुरु आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. 
स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात काही गोष्टी शक्य झाल्या नाहीत त्या तीनवर्षात करुन दाखवल्या असे शहा म्हणाले. मोदी सरकारच्या राजवटीत देशात रोजगार निर्मितीच्या आकडयात विशेष वाढ झाली नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर शहा यांनी सरकारचा स्वंयरोजागारावर भर असल्याचे सांगितले. सत्तेवर येण्याआधी मोदी सरकारने वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला होता. पण 2015 आणि 2016 या वर्षात प्रत्यक्षात सरकार फक्त 1.35 लाख लोकांना रोजगार देऊ शकले असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. 
भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मागच्या तीनवर्षात देशाला चांगले प्रशासन दिल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. धोरण लकव्याने ग्रस्त असलेले सरकार जाऊन 2014 मध्ये आमचे सरकार आले. आम्ही देशाला निर्णायक आणि पारदर्शक कारभार करणारे सरकार दिले. विद्यमान सरकार आणि 10 वर्षाच्या युपीएच्या कारभाराची तुलना करताना शहा म्हणाले की, यूपीएच सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले. पण सध्या विरोधकांना मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार अनेक आघाडयांवर यशस्वी ठरल्याचा त्यांनी दावा केला. वन रँक, वन पेन्शन, जीएसटी, ओबीसी आयोग तसेच अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या प्रगतीचा त्यांनी दाखला दिला. तसेच कर्नाटकमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत बीएस येडियुरप्पा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली 

Web Title: Not everyone can get jobs in 125 crores population - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.