भारतात नव्हे, तर ‘या’ देशात सर्वाधिक हिंदू; एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:06 AM2023-08-16T10:06:17+5:302023-08-16T10:06:45+5:30

जगात सर्वाधिक हिंदू भारतात राहत असल्याचा दावाही अनेक वेळा केला जातो. परंतु ते खरे नाही.

not in india but in this country most hindus residies and know what proportion of the total population | भारतात नव्हे, तर ‘या’ देशात सर्वाधिक हिंदू; एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण किती? जाणून घ्या...

भारतात नव्हे, तर ‘या’ देशात सर्वाधिक हिंदू; एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण किती? जाणून घ्या...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : भारतीय राजकारण हे हिंदुत्वाशिवाय पूर्ण होत नाही. विविध पक्षांच्या जाहीरनाम्यात, निवडणूक प्रचारात, विविध सभांमध्ये त्याबाबत भाष्य केले जाते. जगात सर्वाधिक हिंदू भारतात राहत असल्याचा दावाही अनेक वेळा केला जातो. परंतु ते खरे नाही. त्यामुळे जगात कोणत्या देशात सर्वाधिक हिंदू राहतात, तेथील एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंचे प्रमाण किती आहे, याविषयी...

पाकिस्तानात किती आहे संख्या? 

- पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १.८ टक्के लोक हिंदू आहेत. ही संख्या जवळपास २२ लाख इतकी असल्याचे नॅशनल डेटाबेस ॲण्ड रजिस्ट्रेशन ऑथॉरिटीच्या अहवालात म्हटले आहे.

- पाकिस्तानमध्ये हिंदूंशिवाय ११ अन्य अल्पसंख्याक असून त्यांची संख्या २ हजारांपेक्षाही कमी आहे.

- त्यात बौद्ध १७८७, चिनी ११५१, शिंतो ६२८, ज्यू ६२८, आफ्रिकन १४१८, कलाशधर्मीय १५२२ आणि जैनधर्मीयांची संख्या दहापेक्षाही कमी आहे.

अमेरिकेतही वाढते प्रमाण

गत काही वर्षांत अमेरिकेतही हिंदूंचे प्रमाण वाढत आहे. सध्या तिथे २२ लाखांहून अधिक हिंदू वास्तव्यास असून मंदिरांची संख्या एक हजारांच्याही पुढे गेली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील इस्कॉन मंदिरांची संख्या ३० हून अधिक झाली आहे.

देश        हिंदूंचे प्रमाण
नेपाळ     ८०.६ टक्के 
भारत     ७८.९ टक्के 
मॉरिशस     ४८.४ टक्के 
फिजी     २७.९ टक्के 
गयाना     २३.३ टक्के 
भूतान     २२.५ टक्के 
सुरिनाम     २२.३ टक्के 
त्रिनिदाद व टोबॅगो     १८.२ टक्के 
कतार     १५.१ टक्के 
श्रीलंका     १२.६ टक्के

 

Web Title: not in india but in this country most hindus residies and know what proportion of the total population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hinduहिंदू