इस्लाम, ख्रिश्चन नाही, सर्वोपरी आहे...; 15 ऑगस्टच्या भाषणात काय म्हणाले बाबा रामदेव?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 01:31 PM2023-08-15T13:31:03+5:302023-08-15T13:31:53+5:30
यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले.
काही लोक म्हणतात, धर्म सर्वोपरी आहे. तर काही लोक जात सर्वापरी असल्याचे म्हणतात. मात्र, राष्ट्रधर्म सर्वोपरी आहे, असे योग गुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. त्यांनी देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन पतंजली योगपीठ येथे साजरा केला. येथे आचार्य बालकृष्ण यांच्यासह त्यांनी तिरंगा ध्वज फडकावला. यावेळी ते बोलत होते. महत्वाचे म्हणजे, पतंजली योगपीठ सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी काम करत असल्याचेही बाबा रामदेव यावेळी म्हणाले.
योग गुरु बाबा रामदेव म्हणाले, 'काही लोक इस्लाम सर्वोपरी असल्याचे म्हणतात. काही लोक ख्रिश्चन धर्म सर्वोपरी असल्याचे म्हणतात. कुणी म्हणतय अमूक धर्म सर्वोपरी आहे, अमूक जात सर्वोपरी आहे. आमचे म्हणणे आहे की, राष्ट्र धर्म सर्वोपरी आहे, राष्ट्रप्रेम सर्वोपरी आहे. राष्ट्रहित सर्वोपरी आहे. याच विचारावर पतंजली वाटचाल करत आहे.'
यावेळी तेथे उपस्थित काही पत्रकारांनी त्यांना मणिपूरसंदर्भात काही बोलण्याचा आग्रह केला. मात्र, योगगुरू रामदेव यांनी यावर कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आणि आपले बोलणे संपवले.
यावेळी, आचार्य बालकृष्ण, पतंजलीतील संत, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पतंजलीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी बाबा रामदेव म्हणाले, स्वतंत्र्य दिनाच्य पार्श्वभूमीवर देशाला आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षाणाचे स्वातंत्र्य, वैद्यकीय स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य देण्यासंदर्भात पतंजली योगपीठाने संकल्प घेतला आहे. शिक्षणाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय शिक्षण बोर्ड, पतंजली गुरुकुलम, पतंजली आचार्य कुलम काम करेल.