एक नाही देशात तीन "जीएसटी"
By admin | Published: July 5, 2017 08:21 AM2017-07-05T08:21:44+5:302017-07-05T09:25:23+5:30
देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासून लागू झाला आहे. पण संपूर्ण देशात एक नाही तर 3 जीएसटी जन्माला आले आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासून लागू झाला आहे. पण संपूर्ण देशात एक नाही तर एकूण 3 जीएसटी जन्माला आले आहेत. तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे ? हो हे शक्य आहे. तीन जीएसटीमध्ये एक प्रत्यक्ष कररचना आहे तर, उर्वरित दोन नवजात अर्भक आहेत.
छत्तीसगडमधील गोंडस "जीएसटी"
छत्तीसगडमधील कोरिया येथे 1 जुलैला एक मुलीचा जन्म झाला, आईवडिलांनी तिचे नाव जीएसटी ठेवले आहे. जगदीश प्रसाद आणि सरोजनी असे या दाम्पत्याचे नाव आहे. एक जुलैपासून संपूर्ण देशभरात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला. याच दिवशी सकाळी सरोजनीनं एका मुलीला जन्म दिला. या पार्श्वभूमीवर आईवडिलांनी तिचे नाव जीएसटी असे ठेवले.
देशभरात लागू जीएसटी कर प्रणाली
1 जुलैपासून देशभरात जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर अखेर लागू झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्या बरोबरीनेच मध्यरात्रीच्या ठोक्याला संसदेच्या सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याद्वारे जीएसटी अर्थात गुड्स अॅड सर्व्हिस टॅक्स ही नवी कररचना देशभरात लागू झाली.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जीएसटी केवळ आर्थिक सुधारणा नसून सामाजिक सुधारणेचे प्रतीक आहे. यातून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न केंद्र आणि राज्य मिळून साकार करणार आहेत.
जीएसटीचा अर्थ काय हे सांगताना त्यांनी गुड अँड सिम्पल टॅक्स असा नवा फुलफॉर्म पेश केला. भ्रष्टाचाराला आळा घालणारी जीएसटी हे कोणत्याही एका पक्षाचे वा, एका नेत्याचे नव्हे, तर सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे, असंही मोदी यांनी स्पष्ट केले.