फक्त देशी नाही, बिहारमध्ये सर्व प्रकारच्या दारुवर बंदी येणार
By admin | Published: December 5, 2015 09:14 AM2015-12-05T09:14:52+5:302015-12-05T09:14:52+5:30
बिहारमध्ये फक्त देशी दारुपुरती दारुबंदी करण्यात येणार नसून, सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर ही बंदी असेल असे बिहारचे उत्पादन शुल्क मंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी सांगितले.
Next
>ऑनलाईन लोकमत
पाटना, दि. ५ - बिहारमध्ये फक्त देशी दारुपुरती दारुबंदी करण्यात येणार नसून, सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर ही बंदी असेल असे बिहारचे उत्पादन शुल्क मंत्री अब्दुल जलील मस्तान यांनी सांगितले. पुढच्यावर्षी १ एप्रिल २०१६ पासून सर्व प्रकारच्या दारुविक्रीवर बंदी घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये फक्त देशी दारुवर बंदी येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. त्यावर बोलताना मस्तान यांनी ही माहिती दिली.
कुठल्या प्रकारच्या दारुवर बंदी घालायची हे आम्ही अजून निश्चित केले नसले तरी, सर्व प्रकारच्या दारुवर बंदी असेल असे त्यांनी सांगितले. नितीश कुमार यांनी मागच्या महिन्यात एका कार्यक्रमात दारुबंदीची घोषणा केली होती. त्यांनी निवडणूक प्रचारात दारुबंदीचे आश्वासन दिले होते.
दारुबंदीमुळे कुटुंबाची फरफट होते. महिलांचे हाल होतात त्यामुळे आपले सरकार सत्तेवर आले तर, दारुबंदी करु असे त्यांनी म्हटले होते. दारुबंदी लागू झाल्यानंतर सरकारला मोठया महसूलावर पाणी सोडावे लागेल.