महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी...कसे होणार?, शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 11:16 AM2023-09-07T11:16:13+5:302023-09-07T11:16:30+5:30

सरासरीपेक्षा १० टक्के पाणी कमी

Not only Maharashtra, but the country's dams are 22 percent empty | महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी...कसे होणार?, शेतकरी संकटात

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी...कसे होणार?, शेतकरी संकटात

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही देशातील धरणे अद्याप पूर्ण भरलेली नसल्याने चिंता वाढली आहे. केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत २२% कमी आहे. गेल्या दहा वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के इतके कमी आहे.

जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये विक्रमी वाढ झाली होती; मात्र ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाणीच आले नाही. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा स्थितीत येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई जाणवू शकते. ‘अल निनो’चा परिणाम पावसावर दिसून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रब्बी पिकांना धोका
पावसाचा तुडवडा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेतकऱ्यांवरील ताण आणखी वाढणहर आहे. धरणे कोरडी पडल्याने अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे संकटही निर्माण होऊ शकते.

१२२ वर्षांत सर्वांत कमी पाऊस
यंदा १२२ वर्षांतील सर्वांत कमी पावसाची नोंद ऑगस्टमध्ये झाली आहे. ऑगस्ट महिना ऐतिहासिकदृष्ट्या कोरडा राहिला. या महिन्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा किती? :

ऑगस्ट अखेरीस देशातील १५० धरणांमध्ये ११३.४१७ अब्ज घनमीटर (बीसीएम) होता. गेल्यावर्षी या धरणांमध्ये १४६.८२८ बीसीएम जलसाठा होता. गेल्या १० वर्षांची सरासरी साठा पातळी १२५.११७ बीसीएम आहे.

या राज्यांत धरणे रिकामी

महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू.

उत्तर भाग : हिमाचल, पंजाब, राजस्थान
पूर्व क्षेत्र : त्रिपुरा, ओडिशा, झारखंड, प.बंगाल
पश्चिमी क्षेत्र : गुजरात आणि महाराष्ट्र
मध्य क्षेत्र : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड
दक्षिण क्षेत्र : आंध्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू

 

Web Title: Not only Maharashtra, but the country's dams are 22 percent empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.