विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:19 PM2019-04-16T12:19:07+5:302019-04-16T12:38:38+5:30

ईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. 

Not only Mallya and Nirav, 36 businessmen fled from country in recent past, ED informs court | विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी

विजय मल्या, नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतीचं देशातून पलायन - ईडी

Next
ठळक मुद्देईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला.सुषेन मोहन गुप्ता याने आपले समाजात सर्वदूर संबंध आहेत, असा दावा केला होता. ईडीचे वकील संवेदना वर्मा यांनी युक्तिवादाच्या दरम्यान या प्रकरणाचा तपास हा महत्त्वाच्या टप्प्यावर असून तपास यंत्रणा (ईडी) सुषेनच्या डायरीत उल्लेख केलेला ‘आरजी’ कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली - विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतींनी देशातून पलायन केल्याची माहिती आता समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (15 एप्रिल) 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन मोहन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. 

सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नाही तर अलीकडच्या काळात यांच्यासह 36 उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती दिली आहे. सुषेन मोहन गुप्ता याने आपले समाजात सर्वदूर संबंध आहेत, असा दावा केला होता. त्यावर विजय मल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि स्टर्लिग बायोटेकचे प्रवर्तक संदेसरा बंधू यांचेही समाजात चांगले संबंध होते. मात्र तरीही ते देश सोडून पळून गेले. गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे 36 उद्योगपती देशातून पळून गेले असे ईडीचे विशेष वकील डी.पी. सिंह आणि एन.के. मट्टा यांनी गुप्ता याचा दावा खोडून काढताना सांगितले आहे. 

सक्तवसुली संचालनालयाचे वकील संवेदना वर्मा यांनी युक्तिवादाच्या दरम्यान या प्रकरणाचा तपास हा महत्त्वाच्या टप्प्यावर असून तपास यंत्रणा (ईडी) सुषेनच्या डायरीत उल्लेख केलेला ‘आरजी’ कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. तसेच सुषेन गुप्ता हा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वर्मा यांनी केला आहे. त्याचबरोबर गुप्ता याने या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुषेन मोहन गुप्ता याच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्‍टनुसार (पीएमएलए) कारवाई करण्यात आली. गुप्ताचा ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारासह अनेक संरक्षण व्यवहारात सहभाग होता, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी याआधी दिली होती. गुप्ताकडे व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीसंबंधीची काही माहिती असल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. 

 

Web Title: Not only Mallya and Nirav, 36 businessmen fled from country in recent past, ED informs court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.