आचारसंहितेमुळे यंदा चित्ररथ नाही प्रजासत्ताक दिन : केवळ शालेय सांस्कृतिक कार्यक्रम होणार
By Admin | Published: January 26, 2017 02:07 AM2017-01-26T02:07:36+5:302017-01-26T02:07:36+5:30
जळगाव : प्रजासत्ताक दिनी दरवर्षी ध्वजारोहणाच्या प्रमुख कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शासकीय योजनांच्या चित्ररथांचा सहभाग असतो. मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार होऊ नये यासाठी या कार्यक्रमातून चित्ररथांना वगळण्यात आले आहे.
ज गाव : प्रजासत्ताक दिनी दरवर्षी ध्वजारोहणाच्या प्रमुख कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शासकीय योजनांच्या चित्ररथांचा सहभाग असतो. मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार होऊ नये यासाठी या कार्यक्रमातून चित्ररथांना वगळण्यात आले आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या हस्ते प्रशासनाचा ध्वजारोहरण सोहळा होईल. यानंतर प्रमुख ध्वजारोहणाचा सोहळा सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. यावेळी प्रमुख कार्यक्रमाच्या वेळी ध्वजारोहणास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित रहाणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम ४४ मिनिटांचा असेल. चित्ररथ वगळलेप्रमुख ध्वजारोहणाच्या या सोहळ्यात गेल्या वर्षी जवळपास १० चित्ररथांचा सहभाग होता. यात महसूल प्रशासनाचा राजस्व अभियान, सात-बारा संगणकीकरण, जलसिंचन विभागाचा चित्ररथ, कृषी माहितीवर आधारीत कृषी विभागाचा चित्ररथ सहभागी होता मात्र या वर्षी हे चित्ररथ वगळण्यात आले आहेत. आचारसंहिता असल्यामुळे चित्ररथाव्दारे राजकीय पक्षाने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार, प्रसार होऊ नये तसेच चित्ररथावर कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र असू नये यासाठी यंदा हे चित्ररथ प्रजासत्ताक दिन मुख्य कार्यक्रमातून वगळण्यात आले आहेत. ------असे होणार कार्यक्रम४४ मिनिटांच्या कार्यक्रमात ला.ना. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे योगा पिरॅमिड, नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम नृत्य, पोलीस बॉईजचे कराटे प्रात्यक्षिक, प.न. लुंकड कन्या शाळेच्या विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाण्यावर नृत्य, ला.ना. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वधर्म समभावावर मुक नाट्य, शानबाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बॅँड पथकाचे सादरीकरण, ए.टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले वंदे मातरम गीत, ला.ना. विद्यालयातील महिला शिक्षीकांनी सादर केलेले भारत हमारी मॉ है हे देशभक्तीपर गती यावेळी सादर होईल.