PM किसान सन्मान निधीचा १३वा हप्ता मिळाला नाही? आता हा पर्याय वापरा आणि मिळवा पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 04:45 PM2023-03-18T16:45:15+5:302023-03-18T16:45:50+5:30

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील १३वा हप्ता जारी होऊन १९ दिवस लोटले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्यामधील रक्कम मिळालेली नाही.

Not received the 13th installment of PM Kisan Samman Nidhi? Now use this option and earn money | PM किसान सन्मान निधीचा १३वा हप्ता मिळाला नाही? आता हा पर्याय वापरा आणि मिळवा पैसे 

PM किसान सन्मान निधीचा १३वा हप्ता मिळाला नाही? आता हा पर्याय वापरा आणि मिळवा पैसे 

googlenewsNext

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील १३वा हप्ता जारी होऊन १९ दिवस लोटले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १६ हजार कोटी रुपयांची रक्कम पाठवण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्यामधील रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत.  

पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते, आधार क्रमांकाची योग्य माहिती न दिल्यास तुमचे पैसे अडकू शकतात. तुमच्याकडून दिली गेलेली माहिती योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. त्यावर जाऊन तिथे असलेली माहिती दुरुस्त करा. त्यानंतर ही रक्कम पुढील हप्ता जमा करताना तुमच्या खात्यामध्ये पाठवली जाऊ शकते. त्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व माहिती योग्य प्रकारे द्या. त्याशिवाय ई-केवायसीची प्रक्रियाही पूर्ण करा. 

- सुरुवातीला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा
- त्यानंतर राईट साइडला फार्मर कॉर्नर लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा
- येथे बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा. 
- तिथे तुमचा आधार क्रमांक, अकाऊंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. 
- आधार नंबर नोंदवून गेट डेटा या पर्यायावर क्लिक करा. 
- प्रोसेस फॉलो केल्यावर तुमची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल. जर तुमचा आधार क्रमांक आणि अकाऊंट नंबर चुकीचा असेल. तर तो तुम्ही दुरुस्त करू शकता.

लाभार्थी लिस्टमध्ये सामील झाल्यानंतरही तुमच्या खात्यामध्ये १३ व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता. किंवा पीएम किसान योजनेच्या 155261 किंवा  1800115526 (Toll Free) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार देऊ शकता.  

Web Title: Not received the 13th installment of PM Kisan Samman Nidhi? Now use this option and earn money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.