‘जन गण मन राष्ट्रगीत राहील याची खात्री नाही’

By admin | Published: February 27, 2016 01:48 AM2016-02-27T01:48:16+5:302016-02-27T08:34:33+5:30

‘जन गण मन’च्या ऐवजी ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी हिंदुत्ववादी गट सातत्याने करीत आहेत. त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत.

Not sure that Jana Ganaan will remain the national anthem | ‘जन गण मन राष्ट्रगीत राहील याची खात्री नाही’

‘जन गण मन राष्ट्रगीत राहील याची खात्री नाही’

Next

नवी दिल्ली : ‘जन गण मन’च्या ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची मागणी हिंदुत्ववादी गट सातत्याने करीत आहेत. त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत राहीलच याची खात्री नाही, असे मत ज्येष्ठ इतिहासकार व जेएनयूच्या माजी प्राध्यापक तनिका सरकार यांनी व्यक्त केले.
जेएनयूमध्ये ‘राष्ट्रवाद’ या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत जेएनयूच्या इतिहास विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सरकार यांनी ‘गांधींचा देश’ या विषयावर आपले मत मांडले. उमर खलिद व अनिर्बन भट्टाचार्य हे या विभागाशी संबंधित होते.
खासदार व केरळचे माजी शिक्षण मंत्री ई. टी. मोहम्मद बशीर म्हणाले, जेएनयूमध्ये सुरू असलेले आंदोलन हे फक्त एका विशिष्ट विद्यापीठापुरते नाही तर संपूर्ण देशासाठी आहे.

Web Title: Not sure that Jana Ganaan will remain the national anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.