शाळेत जायची इच्छा नव्हती, १४ वर्षांच्या मुलाने दिल्लीतील तीन शाळांना पाठवला बॉम्बचा मेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:07 PM2024-08-03T12:07:27+5:302024-08-03T12:08:53+5:30

शुक्रवारी दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास येथील समरफिल्ड स्कूलला बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा कॉल आला, यानंतर मोठी खळबळ उडाली.

Not wanting to go to school 14-year-old boy sends bomb mail to three schools in Delhi | शाळेत जायची इच्छा नव्हती, १४ वर्षांच्या मुलाने दिल्लीतील तीन शाळांना पाठवला बॉम्बचा मेल

शाळेत जायची इच्छा नव्हती, १४ वर्षांच्या मुलाने दिल्लीतील तीन शाळांना पाठवला बॉम्बचा मेल

काल शुक्रवारी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास येथील समरफिल्ड शाळेत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना बाहेर काढून बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्बेसारखी कोणतीही वस्तु सापडली नाही. यानंतर पोलिसांना धमकीची  चौकशी केली, यात धक्कादायक खुलासा झाला आहे. शाळेला पाठवलेला मेल १४ वर्षाच्या मुलाने पाठवल्याचे समोर आले आहे.

आशेचा किरण! भूस्खलनानंतर केरळच्या जंगलात चमत्कार; ५ दिवसांनंतर ४ मुलांना वाचवण्यात यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील शाळेत धमकीचा मेल आला होता, त्यानंतर शाळेत सर्च ऑपरेशन करण्यात आले आणि शाळा रिकामी करण्यात आली. हा धमकीचा मेल १४ वर्षांच्या मुलाने पाठवल्याचे समोर आले आहे. त्या मुलाला शाळेत जायची इच्छा नव्हती त्यामुळे त्याने शाळेत बॉम्बेच्या धमकीचा मेल पाठवल्याचे मुलाने पोलिस चौकशीत सांगितले. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

शुक्रवारी दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाशच्या समरफिल्ड स्कूलला धमकीचा मेल आला होता. या मेलमध्ये शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. हा ईमेल रात्री १२.३० वाजता पाठवण्यात आला होता, मात्र शाळा प्रशासनाने शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता ईमेल पाहिला. शाळा प्रशासनाने तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शाळा रिकामी करून तपास सुरू केला. जरी लहान मुलाने मेल पाठवला आहे असं सांगण्यात येत असले तराही पोलिसांनी या धमकीच्या मेल प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.

आणखी दोन शाळेंना पाठवला मेल

तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक गोष्टींकडे लक्ष दिले आणि प्रत्येक टीप धरून तपास केला. तेव्हा पोलिसांच्या तपासाची दिशा या याकडे पोहोचली. तेथून एक धक्कादायक बाब समोर आली. या मुलाची सखोल चौकशी केली असता तो म्हणाला, 'मला शाळेत जायची इच्छा नव्हती, म्हणून मी हा मेल केला. त्या मुलाने आणखी दोन शाळांचा उल्लेख आहे जेणेकरून मेल खरा वाटला. पण पोलिस या प्रकरणाचा अजूनही तपास करत आहेत. 

Web Title: Not wanting to go to school 14-year-old boy sends bomb mail to three schools in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.