चलनात लवकरच येणार 2 हजारांची नोट

By Admin | Published: November 8, 2016 10:28 PM2016-11-08T22:28:18+5:302016-11-08T22:28:18+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे.

Note that 2 thousand notes will be sent soon | चलनात लवकरच येणार 2 हजारांची नोट

चलनात लवकरच येणार 2 हजारांची नोट

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 2 हजार रुपयांची नोट चलनात आणणार आहे. काळा पैशाला आळा घालण्यासाठीच रिझर्व्ह बँकेकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जात असल्याचं काही दिवसांपूर्वीच एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. मात्र आता त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकृतरीत्या दुजोरा दिला आहे. या चलनात येणा-या 2000च्या नवीन नोटांमध्ये जीपीएस बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
म्हैसूरमधल्या चलन छपाई कारखान्यातील मशिनमधून या नोटा छापण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशातील सर्व मोठ्या उद्योगसमूहांना सुरुवातीच्या काळात या नोटा चलन म्हणून वापरात आणण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. या वृत्ताला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून दुजोरा मिळाला आहे.
अर्थ मंत्रालय आणि सुरक्षा प्रींटिंग इंडिया लिमिटेड कॉर्पोरेशन (एसपीएमसीआईएल) यांच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून या नोटा छापण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशमधील देवास आणि महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 40 टक्के नोटा छापल्या जाणार आहेत. तर उर्वरित नोटा मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडाच्या छपाई कारखान्यात छापण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2014-15 या आर्थिक वर्षात 500 आणि 1000च्या जवळपास 86 टक्के नवीन नोटा छापून चलनात आणल्या आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नव्या नोटांची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: Note that 2 thousand notes will be sent soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.