नोट बंदीमुळे होणाऱ्या 'पेन' पेक्षा 'गेन' अधिक - नरेंद्र मोदी
By Admin | Published: November 13, 2016 03:51 PM2016-11-13T15:51:49+5:302016-11-13T15:51:49+5:30
नोटबंदीच्या निर्णयामुळे होत असलेल्या पेन (त्रास) पेक्षा त्यातून देशाला होणारा 'गेन' (लाभ) अधिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. 13 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य देशवासीयांना त्रास होत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तुम्हाला नोट बंदीमुळे 'पेन' होतोय. याची मला जाणीव आहे. पण या निर्णयामुळे होत असलेल्या पेन (त्रास) पेक्षा त्यातून देशाला होणारा 'गेन' (लाभ) अधिक असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
अचानक घेण्यात आलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. एटीएममधून कमी प्रमाणात निघत असलेले पैसे आणि बँकांसमोरील लांबच लांब रांगा यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, गोव्यात केलेल्या भाषणात नोटबंदीमुळे त्रस्त असलेल्या देशवासीयांना 50 दिवस कळ सोसण्याचा सल्ला दिल्यानंतर पंतप्रधानांनी बेळगाव येथे बोलताना नोटबंदीमुळे सध्या त्रास होत असला, तरी त्यातून देशाला मोठा फायदा होईल, असे सांगितले.
येथील भाषणात पंतप्रधानांनी नोटबंदीवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले, "काँग्रेसची कुवत चार आणे बंद करण्याचीच होती. बेईमान लोक आणि बेईमानीला देश वैतागलाय. बदलत्या काळाबरोबर देशात कॅशलेस व्यवहार वाढण्याची आवश्यकता आहे." तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर कुणी बँक खात्यात पैसे जमा करून काळ्या पैशाचे पांढरे करू इच्छीत असेल, तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल. असा इशाराही पंतप्रधानांनी दिला. त्याआधी गोव्यातील सभेत बोलताना पंतप्रधानांनी 50 दिवसांनंतर माझा हा निर्णय चुकीचा वाटल्यास मी शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे म्हटले होते.
There is 'pain' here, but what is more is 'gain' for the country: PM Narendra Modi in Belgaum,Karnataka #BlackMoneypic.twitter.com/KT7RtkK0dP
— ANI (@ANI_news) 13 November 2016
8 Nov raat ko Hindustan ka gareeb chen se so raha tha, aur ameer neend ki goliyan khareedne bazar gaya aur koi dene wala nahin tha: PM Modi pic.twitter.com/QvgzTm7wZw
— ANI (@ANI_news) 13 November 2016