नोटबंदी - ६ दिवसात १७ लोकांचा मृत्यू

By admin | Published: November 14, 2016 09:31 PM2016-11-14T21:31:41+5:302016-11-14T21:31:41+5:30

नोटबंदीचा निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी घेण्यात आला असला तरी यामुळे ६ दिवसात देशभरात १७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Notebook - 17 people die in 6 days | नोटबंदी - ६ दिवसात १७ लोकांचा मृत्यू

नोटबंदी - ६ दिवसात १७ लोकांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेबाहेर लागलेल्या रांगांनी लोकांच्या नाकी नऊ आणले आहेत. तर एटीएमबाहेरही पैसे काढण्यासाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. सकाळी उठायला कंटाळा करणाऱ्या व्यक्तीही  बँक अथवा एटीएमच्या रांगेत उभ्या दिसत आहेत. केंद्र सरकारने काळा पैसा हद्दपार करण्यासाठी चलनातून 500, 1000  रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जरी हा निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी घेण्यात आला असला तरी यामुळे ६ दिवसात देशभरात १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. असे वृत्त जनसत्ताने दिले आहे. 
 
नोटबंदीच्या निर्णायानंतर काही लोकांचा बातमी वाचून-ऐकून मृत्यू झाला तर काही लोकं खूप वेळ रांगेत उभे राहील्यानंतर झाल्याचे एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. 
 
मुंबईमध्ये पाचशे आणि हजारांच्या नोटावर बंदी असल्याने नवीन नोटाचा आग्रह करत गोवंडीतील एका खासगी रुग्णालयाने तीन दिवसांच्या मुलावर उपचार करण्यास नकार दिला. परिणामी राजावाडी रुग्णालयात या मुलाला दाखल करण्यापूर्वी रस्त्यामध्येच या मुलाचा मृत्यू झाला. तर नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केल्याने घाबरून नोटा बदलण्यासाठी गेलेल्या मुलुंडमधील ७३ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.  विश्वनाथ वर्तक सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झाले होते. 
 
उत्तरप्रदेश गोरखपूरमधील एका महिलेचा मृत्यू नोटबंदीचा निर्णयाची बातमी ऐकून झाला. त्यामहिलेने दोन दिवसापुर्वीच १००च्या नोटांचे रूपांतर करून १०००च्या दोन नोटा घेतल्या होत्या. ती बँकेत जमाकरण्यासाठी जाणार होती.त्यावेळी नोटबंदीची बातमी ऐकून तीचा मृत्यू झाला. यावेळी तिथे एका वृद्धाचा देखिल मृत्यू झाल्याचा रिपोर्ट आहे. 
 
गुजरात सुरेंद्रनगरमधील लिमदी मध्ये ६९ वर्षीय वृद्धाचा तसेच मध्यप्रदेश सागर कस्‍ब्यात खूप वेळ रांगेत उभे राहिल्यामुळे ह्रद्यविकाराच्या झटक्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. उत्तप्रदेश मैनपुरी रुग्णालयात जुन्या नोटा न घेतल्याने लहान मुलाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे विशाखापट्टनममध्येही रुग्णालयात १८ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल. जयपुरमध्ये एकाने असा दावा केला की एम्‍बुलेंसने जुन्यानोटा घेण्यास नकार दिल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. जुन्या नोटा असल्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बालकाला रूग्णालयात नेहण्यासाठी कोणतीच एम्‍बुलेंस तयार होत नव्हती. १००च्या नोटांची तडजोड करोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. 
 
 
छत्‍तीसगढ़मध्ये सोमवारी 45 वर्षीय शेतकऱ्यानी आत्महत्या केली. नोटबदलीसाठी रांगेत खूपवेळा उभे राहूनदेखील नोटबदली करता न आल्याने तणात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे स्थानिकांनी सांगितले.  प.बंगालमध्ये नोटबदली करण्याच्या तणावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केला. पत्नी एटीएममधून रिकाम्या हाताना आली. तीने अजून काही वेळ रागेंत उभे राहिला हवे होते म्हणून त्याने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. 
 

Web Title: Notebook - 17 people die in 6 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.