सिडकोची २१९ अनधिकृत बांधकामांना नोटीस लवकरच कारवाई होणार : २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय नाही
By admin | Published: August 7, 2015 09:35 PM2015-08-07T21:35:24+5:302015-08-07T21:35:24+5:30
नवी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे.
Next
न ी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे. नवी मुंबईमधील मूळ गावठाणांमध्ये गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पाठपुरावा सुरू केला आहे. जानेवारी २०१३ पर्यंतची घरे नियमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानंतरच्या बांधकामांवर कारवाई करण्यास सिडकोने सुरुवात केली आहे. जूनमध्ये सुरू केलेल्या कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. ग्रामस्थांनी सिडकोवर भव्य मोर्चा काढून कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवस थांबलेली कारवाई आता पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने नवी मुंबई व पनवेल परिसरातील २१९ बांधकामांची यादी तयार केली आहे. विभागनिहाय अतिक्रमण करणार्यांची यादीच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत १ जानेवारी २०१३ नंतर बांधलेली बांधकामे पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधितांना १० दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली असून त्यानंतर कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सिडकोने पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध केली आहे. या बांधकामांवर कारवाई केल्यानंतर दुसर्या टप्प्यातील बांधकामे पाडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये काही राजकीय पदाधिकार्यांचाही समावेश आहे. एका माजी नगरसेवकाला नोटीस देण्यात आली आहे. विद्यमान नगरसेवकाच्या पत्नीलाही नोटीस दिली आहे. यामुळे काही जणांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोच्या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे. पुन्हा या कारवाईिवरोधात आंदोलन सुरू होणार की सिडको कारवाई करण्यास यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)..........नोटीसांचा विभागवार तपशीलविभागअतिक्रमणेउरण १०करंजाडे२०पनवेल९उलवे १८तळोजा५कामोठा१७खारघर४२दिघा ३कोपरखैरणे५ऐरोली१३नेरूळ २१घणसोली३५बेलापूर७वाशी १३सानपाडा१