मुख्याध्यापकासह चौघांना वेतनवाढ बंदची नोटीस
By Admin | Published: September 26, 2014 12:44 AM2014-09-26T00:44:10+5:302014-09-26T01:54:58+5:30
बीड : येथील चंपावती शाळेत उपशिक्षणाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता़ याप्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी मुख्याध्यापकांसह
बीड : येथील चंपावती शाळेत उपशिक्षणाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता़ याप्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून शुक्रवारी मुख्याध्यापकांसह चौघाची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस दिली आहे़
माध्यमिक विभागाचे शिक्षक संजय खाडे हे शहीद भगतसिंग विद्यालयात अतिरिक्त ठरले होते़ त्यानंतर त्यांना चंपावती विद्यालयात सामावून घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते़ मात्र, संस्था त्यांना काही रुजू करुन घेण्यास तयार नव्हती़ त्यामुळे बुधवारी शिक्षण विभागाचे पथक चंपावती विद्यालयात खाडे यांना रुजू करण्यासाठी गेले होते़ यावेळी डॉ़ साहेबराव भोपळे यांनी उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांना धक्काबुक्की केली होती़ शिवाय मुख्याध्यापक हौस्राव पवार यांचे मस्टरही पळविले होते़ गुरुवारी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी धक्काबुक्की प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज मागवून वरिष्ठांचे आदेश न पाळल्याने संस्थेची मान्यता काढण्याची तंबी दिली होती़
शुक्रवारी शिक्षणाधिकारी सानप यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मुख्याध्यापक हौसराव पवार, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुख्य लिपिक यांची एक वेतनवढ कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावली़ या नोटिशीचा तीन दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे़ खुलासा न केल्यास एकतर्फी कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली आहे़ याशिवाय धर्मादाय आयुक्त यांच्याकडून संस्थेची अधिकृत कार्यकारिणी नेमकी कोणती? याची माहितीही मागवून घेतली आहे़
पोलीस अधीक्षकांनाही पत्र
चंपावती शाळेत घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती शिक्षणाधिकार लता सानप यांनी एका पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनाही कळवली़ (प्रतिनिधी)
चंपावती शाळेने वरिष्ठ लिपिक संजय कुलकर्णी यांना चंपावती संस्थेने मानधनस्वरुपात संस्थेने घेतले होते़
४मात्र, मानधनाऐवजी थेट वेतनश्रेणी मंजूर केली़ माध्यमिक शिक्षण विभागाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी रक्कम वसूल करण्यासाठी चंपावती शाळेला पत्र पाठविले़
४कुलकर्णी यांनी वेतनापोटी तब्बल तीन लाखाहून अधिक रुपये उचलले आहेत़ ही रक्कम वसूल केली जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी दिली़