आदर्शप्रकरणी न्यायालयाची केंद्राला नोटीस
By admin | Published: September 10, 2016 03:28 AM2016-09-10T03:28:26+5:302016-09-10T03:28:26+5:30
आदर्श सोसायटीच्या देखभालीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले.
नवी दिल्ली : कुलाब्यातील आदर्श सोसायटीच्या देखभालीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. ही २८ मजली इमारत लष्कराच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने आधी दिल्यानंतर तेथील लिफ्ट, जनरेटर, अग्निशमन यंत्रणा यांच्या देखभालीसाठी आम्हाला आत प्रवेश द्यावा, असा अर्ज आदर्शतर्फे करण्यात आला होता. तो फेटाळून लावताना, तुम्ही देखभालीचा खर्च करायला तयार आहात का, देखभाल लष्कर करेल, असे न्यायालयाने अर्जदारांना सांगितले होते. आम्हाला आतमध्ये जाण्यास बंदी असल्याने इमारतीचा ताबा असलेल्या मिलिटरी इंजिनीअरिंग सर्विसेसला देखभालीच्या सूचना देण्यात याव्यात, असे म्हणणे आदर्श सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मांडण्यात आले.