नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी कारवाईच्या सूचना: पूररेषा, नालेमोजणी बाकीच

By admin | Published: May 17, 2016 09:15 PM2016-05-17T21:15:02+5:302016-05-17T21:15:02+5:30

जळगाव : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महापालिका नररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम व अन्य अधिकार्‍यांनी मंगळवारी नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी केली. अतिक्रमण विभागास काही ठिकाणी कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Notice of encroachment on the Nullahs: Notice of action: flood line, pending rest | नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी कारवाईच्या सूचना: पूररेषा, नालेमोजणी बाकीच

नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी कारवाईच्या सूचना: पूररेषा, नालेमोजणी बाकीच

Next
गाव : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महापालिका नररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम व अन्य अधिकार्‍यांनी मंगळवारी नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी केली. अतिक्रमण विभागास काही ठिकाणी कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मनपा प्रशासनास पत्र देऊन गेल्या वर्षी मेहरूण तांबापुरा भागात पुराचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीबाबत स्मरण करून देत नाल्यावरील अतिक्रमणे तसेच साफसफाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी अधिकार्‍यांना प्रमुख नाल्यांवरील अतिक्रमणांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.
अधिकार्‍यांच्या पथकाची भेट
आयुक्तांच्या सूचनेनुसार नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांनी आज या भागात भेटी दिल्या. यात प्रामुख्याने मेहरूण भागातील मिल्लत हायस्कूल, आक्सा नगरमध्ये नाल्याचे पाणी गेल्या वर्षी झोपड्यांमध्ये शिरून नुकसान झाले होते. या ठिकाणी अतिक्रमणे अद्यापही जैसे थे असल्याचे लक्षात आले. त्यानुसार अतिक्रमण विभागास सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन विभागांना पत्र
पूर रेषा आखून मिळावी यासाठी जलसंपदा विभागास मनपा गेल्या वर्षी पत्र दिले आहे. तसेच नाल्यांची मोजणी करण्या संदर्भात जमीन भूमापन विभागास पत्र देण्यात आले आहे. वर्ष उलटूनही या दोन्ही विभागांनी मनपाच्या पत्रानुसार कार्यवाही केलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना पत्र देण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
विविध उपाय योजना
वादळाने पडू शकतील असे होल्डिंग काढले जाणार, धोकादायक खड्डे बुजविले जाणार, वीज वाहक तारांलगतच्या झाडांच्या फांद्या काढण्यास सुरुवात, पावसामुळे साथीचे रोग पसरल्यास उपाय योजनेच्या सूचना, पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी खबरदारीच्या सूचना. मान्सूनपूर्व बैठकीत या नुसार नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Notice of encroachment on the Nullahs: Notice of action: flood line, pending rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.