जेएनयूतील कारवाईबद्दल गृहमंत्रालयाला नोटीस

By Admin | Published: February 18, 2016 06:38 AM2016-02-18T06:38:40+5:302016-02-18T06:38:40+5:30

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जेएनयूमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत केंद्रीय गृहसचिव, दिल्लीचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त, तसेच जेएनयूच्या कुलसचिवांना दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा

Notice to Home Ministry about JNU's action | जेएनयूतील कारवाईबद्दल गृहमंत्रालयाला नोटीस

जेएनयूतील कारवाईबद्दल गृहमंत्रालयाला नोटीस

googlenewsNext

नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जेएनयूमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत केंद्रीय गृहसचिव, दिल्लीचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त, तसेच जेएनयूच्या कुलसचिवांना दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे; मात्र दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेला जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचा दावा करून त्याला क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले आहे.
कन्हैयाला देशविरोधी घोषणा दिल्यामुळे अटक करण्यात आल्याच्या वृत्ताची स्वत:हून दखल घेत मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली. दिल्ली पोलिसांनी कन्हय्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याची आणि शिक्षण संस्थांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दपडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केल्याची बाबही आयोगाने नमूद केली आहे.
आरोप खोटे : प्रशांत भूषण
कन्हैया कुमार याला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्याची न्यायालयात बाजू मांडण्याला मी तयार आहे, असे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले.
सुटका लवकर व्हावी
कन्हैया कुमार याची लवकर सुटका व्हावी यासाठी मी प्रार्थना करीत असून मला तशी आशा आहे. मी कन्हैयाचे भाषण ऐकले आहे. मूळच्या बिहारमधील या विद्यार्थ्याने देश किंवा राज्य घटनेविरुद्ध कोणतेही विधान केलेले नाही, असे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Notice to Home Ministry about JNU's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.