भाजपच्या 8 बंडखोरांना नोटीस! आठवडाभराच्या आत उत्तर देण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 04:25 PM2023-09-30T16:25:03+5:302023-09-30T16:25:29+5:30
पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनुशासन समितीने शुक्रवारी काश्मीरमधील आठ बंडखोरांना नोटीस बजावली आहे. पक्ष शिस्तीला बाधा पोहोचेल अशा कामांमध्ये सामील होणे आणि पक्षाच्या नेतृत्वाप्रति अविश्वासाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्या आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
संबंधित नोटिशीत म्हणण्यात आले आहे की, जम्मू-काश्मीर भाजप उपाध्यक्ष सोफी युसूफ विरोधातील चौकशीत अनुशासन समितीच्या निदर्शनास आले आहे की, आपल्या सर्वांच्या विरोधात पक्ष शिस्तीला बाधा पोहोचेल अशा कामांमध्ये सामील होण्याचा गंभीर आरोप आहे आणि अनुशासनहीनतेचे पुरावेही आहेत.
एवढेच नाही, तर आपल्या वर्तनामुळे पक्ष नेतृत्वात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. पक्षातील आपली स्थिती आणि आपले योगदान लक्षात घेत, अनुशासन समितीने आपल्याला आपल्या आचरणासाठी बिनशर्त माफी मांगण्यासंदर्भात आणि भविष्यात पुन्हा आशी चूक होणार नाही, अशी अपेक्षा करत एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आपण असे केले नाही, तर अनुशासन समिती आपल्या विरोधात नियमित कार्यवाही सुरू करेल. अनुशासनहीनतेचा आरोप सिद्ध झाल्यास, आपल्याला आपल्या पदावरून आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यतेवरून हाटवले जाऊ शकते, असेही या नोटिशीत म्हण्यात आले आहे.
बिनशर्त माफी मागा -
समितीने या बंडखोरांना बिनशर्त माफी मागण्यास आणि भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही, असे शपथपत्र देण्यास सांगितले आहे. हे एका आठवड्याच्या आत पक्षाच्या अध्यक्षांना पाठवावे जाऊ शकते. ही नोटीस व्हॉट्स अॅपच्या माध्यमाने देण्यात आली आहे.