११६ शिक्षकांसह १० बीओंना नोटिसा
By admin | Published: July 23, 2016 12:02 AM2016-07-23T00:02:35+5:302016-07-23T00:02:35+5:30
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये त्रुटी आढळलेल्या १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना तसेच १० तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकार्यांना शुक्रवारी सायंकाळी नोटिसा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या नोटिसा बजावल्या असून, सात दिवसात खुलासा मागविला आहे.
Next
ज गाव : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये त्रुटी आढळलेल्या १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना तसेच १० तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकार्यांना शुक्रवारी सायंकाळी नोटिसा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या नोटिसा बजावल्या असून, सात दिवसात खुलासा मागविला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार १५ तालुक्यांमध्ये जि.प.च्या शाळांमध्ये १४ जुलै रोजी तहसीलदार व त्यांच्या पथकांनी तपासणी केली होती. त्यात अमळनेर, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा पाच तालुक्यांमधील १२३ शाळांच्या तपासणी अहवालांच्या छाननीनंतर ९७ शाळांंच्या मुख्याध्यापकांना शिस्तभंगविषयक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आता १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना व संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्यांनाही नोटिसा दिल्या आहेत. आता नोटिसा दिलेल्या शिक्षकांची तालुकानिहाय संख्या : भडगाव ११, जळगाव १८, जामनेर ११, धरणगाव २, एरंडोल २, मुक्ताईनगर ४, पाचोरा १८, पारोळा १६, रावेर २१, यावल १३. यापूर्वी अमळनेर तालुक्यातील १६ , भुसावळ २५, बोदवड १६, चाळीसगाव २४, तर चोपडा तालुक्यातील १६. आतापर्यंत सर्व १५ तालुक्यांमधील ३२२ शाळांच्या तपासणी अहवालांची छाननी पूर्ण झाली असून, एकूण २१३ शिक्षक व १५ गटशिक्षणाधिकारी यांना नोटिसा दिल्या आहेत. नोटिसा बजावलेल्या शिक्षकांसह १० तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्यांना सात दिवसात खुलासा द्यावा लागणार आहे. खुलासा समाधानकारक, वस्तुस्थितीला धरून नसला तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनाही आपला खुलासा द्यावा लागेल. संबंधित गटशिक्षणाधिकार्यांनी आपापल्या तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्याकडून खुलासे मागवावेत, असे आदेशही देण्यात आले आहेत.