मंगळवेढा,माढ्याच्या उपनिबंधकांना नोटिसा
By Admin | Published: June 26, 2015 01:26 AM2015-06-26T01:26:27+5:302015-06-26T01:26:27+5:30
विकास सोसायट्यांच्या याद्याबाबत तक्रारी : तीन दिवसात खुलासा देण्याची मुदत
व कास सोसायट्यांच्या याद्याबाबत तक्रारी : तीन दिवसात खुलासा देण्याची मुदत सोलापूर: विकास सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या याद्याबाबत तक्रारींची दखल घेत नसल्याने मंगळवेढा व माढ्याच्या उपनिबंधकांना जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस बजावली आहे. तीन दिवसात खुलासा सादर केला नाही तर कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावोगावच्या विकास सोसायट्यांचा त्यामध्ये समावेश आहे. आजपर्यंत पुढार्यांच्या ताब्यात सोसायटी निवडणूक प्रक्रिया असल्याच्या निवडणुका कागदावरच दाखविल्या जात असल्याचे चित्र होते. ते बदलण्यासाठी आता सहकार खात्याकडे प्राधिकरण स्थापन केले आहे. प्राधिकरणामार्फत निवडणुका होत असल्या तरी पुढारी हातचलाखी करीतच आहेत. गावपातळीवर सेक्रेटरीला हाताशी धरुन विरोधी सदस्यांना थकबाकीच्या यादीत टाकून वगळणे तर आपल्या मर्जीतील नव्याने सभासद यादीत घुसडण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत आहे. यामुळेच अनेक ठिकाणच्या विकास सोसायट्यांच्या मतदार यादीबाबत तक्रारी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकार्यांकडे आल्या आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, नंदूर, मारोळे, खोमनाळ, आंधळगावसह अन्य गावात असे प्रकार झाले आहेत. माढा तालुक्यातूनही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. तालुका पातळीवर बोगस सभासदांबाबत दिलेल्या तक्रारीचे निराकरण केले जात नाही व सभासदांची यादी जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवली जाते. दावे हरकतीबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती न देणे, यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही जाणूनबुजून दुर्लक्ष करणे, आपण व आपल्या कर्मचार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार झाले असल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. यामुळे मंगळवेढ्याचे सहायक निबंधक बी.एस. कटकधोंड व माढ्याचे ए.बी.थोरात यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत होणार्या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. चौकटसहकारी प्राधिकरणाचीही नाराजीचुकीच्या पद्धतीने होणार्या मतदार यादीला आक्षेप घेतल्यानंतरही त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने तक्रारदारांनी सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडेही तक्रारी केल्या आहेत. वारंवार तक्रारी वरिष्ठांकडे जात असल्याने प्राधिकरणानेही अशा अधिकार्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. कोटमरवडे विकास सोसायटीच्या यादीत बोगस नावाचा समावेश केला आहे. याबाबत तक्रारी दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. याप्रमाणेच तालुक्यातील अन्य गावातही असाच प्रकार झाला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत.रजाक मुजावरउपसरपंच, मरवडे,ता. मंगळवेढा