सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी

By Admin | Published: July 27, 2016 04:47 AM2016-07-27T04:47:22+5:302016-07-27T04:47:22+5:30

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यानुसार

Notification of Seventh Pay Commission issued | सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी

सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी

googlenewsNext

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यानुसार आता मूळ वेतनाच्या २.५७ पट वाढ होणार आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मासिक किमान वेतन १ जानेवारी २०१६ पासून १८,००० रुपये, तर उच्च श्रेणीतील वेतन २.५ लाख रुपये असणार आहे. यापूर्वी हे वेतन किमान ७००० रुपये तर अधिकाधिक ९०,००० रुपये होते. यासोबतच वेतनवृद्धीसाठी (इन्क्रिमेंट) आता दोन तारखा असणार आहेत. १ जानेवारी आणि १ जुलै अशा या तारखा आहेत. यापूर्वी यासाठी केवळ १ जुलै हीच तारीख होती. कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती या आधारावर या दोनपैकी एका तारखेला वेतनात वार्षिक वाढ होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Notification of Seventh Pay Commission issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.