४ हजार व्यावसायिकांना करनिर्धारणाच्या नोटिसा मनपाचा एलबीटी विभाग : आर्थिक उत्पन्नात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 12:05 AM2016-01-26T00:05:18+5:302016-01-26T00:05:18+5:30
जळगाव : मनपाच्या एलबीटी विभागातर्फे २०१३-२०१४ व तसेच २०१४-२०१५ सालात शहरातील सुमारे चार हजार व्यावसायिकांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांना स्मरण देण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यांना करनिर्धारणाच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
Next
ज गाव : मनपाच्या एलबीटी विभागातर्फे २०१३-२०१४ व तसेच २०१४-२०१५ सालात शहरातील सुमारे चार हजार व्यावसायिकांनी अद्याप विवरण पत्र सादर केलेले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर संबंधितांना स्मरण देण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे त्यांना करनिर्धारणाच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. जळगाव शहरात एकूण एकूण ८ हजार व्यावसायिक आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना दरवर्षी विवरण पत्र सादर करणे अनिवार्य आहे. परंतु, गेल्या दोन वर्षात अनेक व्यावसायिकांनी त्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत ज्या व्यावसायिकांनी विवरण पत्र सादर केलेले नाही. त्यांनी तत्काळ सादर करण्याचे मनपातर्फे सूचित करण्यात आले आहेत. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. व्यावसायिकांना सुरुवातीला इन्कमटॅक्स विभागाकडे विवरण पत्र द्यावे लागते. त्याची पडताळणी झाल्यानंतर हे पत्र मनपाच्या एलबीटी विभागाकडे प्राप्त होते. परंतु, अद्याप इन्कमटॅक्स विभागाकडेही व्यावसायिकांचे विवरण पत्र प्राप्त झालेले नाहीत. मनपाच्या आर्थिक उत्पन्नात घट शासनाने दरवर्षी ५० कोटी उलाढाल असलेल्या कंपनी व व्यावसायिकांना स्थानिक संस्था कर भरावा लागेल, असे सूचित केले आहे. त्यानुषंगाने विचार केला तर जळगाव शहरात २८ व्यावसायिक येत होते. कालांतराने शासनाने पेट्रोल व डिझेलवरची एलबीटीही रद्द केल्याने जळगाव शहरातील ३ व्यावसायिकांकडून प्राप्त होणारे उत्पन्नही मनपाला मिळणे बंद झाले आहे. सद्य:स्थितीत आता ५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेले २५ व्यावसायिक शहरात आहेत. त्यांच्याकडून मनपाला दरमहा ८५ लाख रुपये कर स्वरूपात मिळत आहे. पूर्वी २८ व्यावसायिकांकडून मनपाला १ कोटीहून अधिक कर मिळत होता. त्यामुळे मनपाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे.