कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या कन्येची भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 01:52 PM2020-07-16T13:52:16+5:302020-07-16T13:57:24+5:30
विद्या राणी हिच्याप्रमाणेच माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचे नातेवाईक आणि इतर अनेक चित्रपट कलावंतांचीही विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.
चेन्नई - कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याच्या कन्येने काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, आता भाजपाच्यातामिळनाडू प्रदेश कार्यकारिणीने वीरप्पनची कन्या विद्याराणी हिची तामिळनाडू भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विद्या राणी हिच्याप्रमाणेच माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचे नातेवाईक आणि इतर अनेक चित्रपट कलावंतांचीही विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे यावर्षीच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे एल. मुरुगन हे राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एआयएडीएमकेचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांची दत्तक कन्या गीता, रामचंद्रन यांचे भाऊ एमसी चक्रपाणी यांचा मुलगा आर. प्रवीण आणि अभिनेत्री राधा रवी यांना पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समिती सदस्या नियुक्त करण्यात आले आहे.
कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याला २००४ मध्ये पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. वीरप्पन याने २०००मध्ये कन्नड अभिनेते राजकुमार आणि २००२ मध्ये कर्नाटकचे माजी मंत्री एच. नागप्पा यांचे अपहरण केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही