कंडोमखेरीज पुरुषांसाठी नवं गर्भनिरोधक
By admin | Published: February 7, 2017 04:10 PM2017-02-07T16:10:32+5:302017-02-07T16:10:32+5:30
पुरूषांसाठी गर्भनिरोधकाचं नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - पुरुषांसाठी गर्भनिरोधकाचं नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. माकडांवर याची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. व्हेसलक्रिमद्वारे शुक्राणुंच्या प्रवाहाला थांबवता येऊ शकतं असं या चाचणीतून दिसून आलंय.
पुरूषांच्या शरीरातील ज्या नलिकेद्वारे शुक्राणू लिंगापर्यंत जातात त्या नलिकेत व्हेसलक्रिम टाकली जाते. माकडांवर दोन वर्ष परीक्षण केल्यानंतर ही क्रिम योग्य कार्य करत असल्याचं समोर आलं आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे.
काही वर्षांमध्ये या क्रिमचा वापर पुरुषांसाठी केला जाऊ शकतो असं क्रिम निर्मात्या कंपनीचं म्हणणं आहे. या क्रिमला कायद्याची मंजुरी मिळाली तर व्हेसलजेल हे क्रिम स्वरुपातील पहिलं पुरूष गर्भनिरोधक असू शकतं. गर्भनिरोधनासाठी पुरूषांकडे सध्या कंडोम आणि नसबंदी हे दोन मार्ग उपलब्ध आहेत.