विविध वर्षी १ नोव्हेंबरला सात राज्ये, तीन केंद्रशासित प्रदेशांची झाली निर्मिती; पंतप्रधानांकडून शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:00 AM2020-11-02T05:00:17+5:302020-11-02T06:21:25+5:30
states and union territories : देशाला अभिमान वाटावे असे कार्य ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जनतेने करावे, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. १ नोव्हेंबर रोजी स्थापन झालेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली : विविध वर्षी १ नोव्हेंबरला साकारलेल्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, पंजाब, केरळ ही सात राज्ये व अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, पुुड्डुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाला अभिमान वाटावे असे कार्य ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जनतेने करावे, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. १ नोव्हेंबर रोजी स्थापन झालेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरयाणा, पंजाब, छत्तीसगड या राज्यांनी निर्मितीनंतर देशाच्या एकूणच विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. पंजाबसारख्या राज्यांचे शेती उत्पन्नात महत्वाचे योगदान राहिलेले आहे.
राज्ये मुख्यमंत्री पक्ष लोकसंख्या
आंध्र प्रदेश वाय. एस. जगनमोहन रेड्डी वायएसआर काँग्रेस ४.९४ कोटी
कर्नाटक बी. एस. येडीयुरप्पा भाजप ६.४१ कोटी
मध्यप्रदेश शिवराजसिंह चौहान भाजप ७.३३ कोटी
केरळ पिनाराई विजयन माकप ३.४८ कोटी
हरयाणा मनोहरलाल खट्टर भाजप २.५४ कोटी
पंजाब कॅप्टन अमरिंदरसिंग काँग्रेस २.८ कोटी
छत्तीसगढ भूपेश बघेल काँग्रेस ३.२२ कोटी
केंद्रशासित प्रदेश नायब राज्यपाल/ मुख्यमंत्री पक्ष लोकसंख्या
पुड्डुचेरी वेलूनारायण स्वामी काँग्रेस २.४२ लाख
अंदमान निकोबार देवेंद्रकुमार जोशी ——- ४.३४ लाख
लक्षद्वीप दिनेश्वर शर्मा ——— ६४,४२९