आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 06:06 AM2022-10-28T06:06:22+5:302022-10-28T06:58:41+5:30

सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजिण्यात आले आहे.

Now a branch of NIA in every state; Announcement by Union Home Minister Amit Shah | आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

आता प्रत्येक राज्यात एनआयएची शाखा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

googlenewsNext

सूरजकुंड : दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) शाखा स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजिण्यात आले आहे. त्यावेळी शहा म्हणाले की, एनआयएच्या रचनेत तसेच यूएपीए कायद्यात आमच्या सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. 

एनआयएच्या कार्यकक्षेचा विस्तार करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्याचा एनआयएला अधिकार देण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बीमोड करणे ही केंद्र व राज्य सरकारांची संयुक्त जबाबदारी आहे. (वृत्तसंस्था)

दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७४ टक्के घट
२०१४ सालापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७४ टक्के, दहशतवादी करत असलेल्या हत्यांमध्ये ९० टक्के घट झाली आहे. देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आता आणखी मजबूत झाली आहे. आजवर पोलीस, सीएपीएफच्या ३५ हजार कर्मचायांनी हौतात्म्य पत्करले आहे. - अमित शहा

Web Title: Now a branch of NIA in every state; Announcement by Union Home Minister Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.