10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आता आधार कार्ड सक्तीचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 04:08 PM2017-11-15T16:08:43+5:302017-11-15T16:09:52+5:30

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहेत.

Now the Aadhar card is mandatory for students of 10th and 12th students to sit for the exam | 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आता आधार कार्ड सक्तीचे

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आता आधार कार्ड सक्तीचे

Next

लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये 10वी व 12वीच्या परीक्षेसाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातल्या माध्यमिक शिक्षा परिषदेनं 6 फेब्रुवारी 2018पासून 10वी, 12वीच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्रासह आधार कार्डही अनिवार्य केलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आधार कार्डही घेऊन जावं लागणार आहे.

बोर्ड परीक्षेच्या ऑनलाइन केंद्राच्या सूचनेनुसार योगी आदित्यनाथ सरकारमधील अप्पर मुख्य सचिव संजय अग्रवाल यांनी राज्यांतील विद्यालयाच्या निरीक्षकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आधार कार्ड सक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. अप्पर मुख्य सचिवांच्या हवाल्यानं इलाहाबादच्या डीआयओएस म्हणाले, जो विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवेशपत्रासह आधार कार्ड आणणार नाहीत, त्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही.

जर एखादा विद्यार्थी आधार कार्ड नसल्यानं परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार आहे. 10वी व 12वीच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्या परीक्षार्थींना आधार नंबर देण्यात आलेला नाही, त्यांचे फॉर्म रद्द करण्यात आले नाहीत. तसेच नेपाळच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आधारमधून सूट देण्यात आली आहे.

Web Title: Now the Aadhar card is mandatory for students of 10th and 12th students to sit for the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.